आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Told To SC; Restrain Media From Speculation,

मी कुंटणखाना चालवत होतो काय? आसाराम बापुंचा सुप्रीम कोर्टात सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून तुरुंगाची हवा खात असलेले अध्यात्मिक गुरू आसाराम बापुंना आता स्वत:च्या प्रतिष्ठेची चिंता सतावते आहे. प्रसारमाध्यमे माझ्याबाबत चुकीच्या पद्धतीने वृत्तांकन करत असून त्यामुळे समाजात माझी प्रतिमा मलिन होत आहे. 'मी कुंटणखाना चालवत होतो काय?', असा सवाल आसाराम बापुंनी आज (मंगळवारी) सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान उपस्थित केला.

आसाराम म्हणाले, प्रसारमाध्यमे माझ्याविरूद्ध चुकीच्या पद्धतीने वृत्तांकन करत असून त्यामुळे माझ्यासह माझ्या कुटूं‍बियांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. माझी प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. अशा चुकीच्या पद्धतीने वृत्तांकन करणार्‍यांवर सुप्रीम कोर्टाने बंदी घालावी.

आसाराम यांचे वकील विकास सिंह यांनी सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या खंडपीठाला सांगितले, की, कोर्टाच्या कार्यवाहीवर प्रसारमाध्यमे योग्य पद्धतीने वृत्तांकन करत आहेत. मात्र आसाराम बापू आणि त्यांच्या आश्रमांबाबत जनतेमध्ये संभ्रामावस्था निर्माण केली जात आहे.

आसाराम बापुंच्या आश्रमात 10 हजार मुले- मुली शिक्षण घेत आहेत. आसाराम बापुंविरोधात प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होणार्‍या वृत्तामुळे त्या मुलांवर विपरित परिणाम होत आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या 21 ऑक्टोबरला होणार आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, आसाराम बापूंवर 'चल गुरू हो जा शुरू' सिनेमा