आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापूंची एम्समध्ये तपासणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जोधपूर बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापूची अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या(एम्स) डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात आसारामने प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव जामीन अर्ज केला होता. यात त्याने न्यूराल्जियाची तक्रार असल्याचे म्हटले होते जोधपूर रुग्णालयाचे वैद्यकीय अहवालही सादर केले होते. न्यायालयाने एम्सच्या डॉक्टरांना यासंबंधीचा वैद्यकीय अहवाल देण्याचे आदेश दिले होते.

एम्सच्या सदस्यीय डॉक्टरांच्या टीमने आसारामची तपासणी केली असून एम्सच्या रेडिओलॉजी विभागाकडे वैद्यकीय अहवाल दिला आहे. तो दोन दिवसांत सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाईल.असे एम्सच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीदरम्यान आसारामने पूर्ण सहकार्य केल्याचे संबंधितांनी सांगितले.

चेहर्‍यावर डोक्यात दुखत असल्याची तक्रार त्याने केली. एम्स वैद्यकीय तपासणी मंडळाचे प्रमुख म्हणून डॉ. शशांक काळे यांनी काम पाहिले. तपासणीदरम्यान आसारामच्या समर्थकांनी रुग्णालयाच्या परिसरात गर्दी केली होती.