आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण: अटकेच्या भीतीने आसारामबापू निसटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ/जोधपुर - अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप असलेले आसारामबापू अटकेच्या भीतीने भोपाळहून निसटले. दिल्लीला जाण्यासाठी ते शुक्रवारी भोपाळ विमानतळावर पोहोचले. मात्र त्यांचे विमान हुकले. यानंतर ते इंदूरकडे रवाना झाले. त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र कोर्टाने त्यांना राजस्थान कोर्टाकडे जाण्यास सांगितले. अर्ज मागे न घेतल्यास तो फेटाळला जाईल, असा सल्लाही दिला. जोधपुर पोलिसांनी आसारामबापू यांना 30 ऑगस्टपर्यंत हजर राहण्यास
सांगितले होते. ती मुदत संपल्यानंतर तेथील पोलिस पथक मध्य प्रदेशकडे रवाना झाले.
याच्या एका दिवसापूर्वी आसारामबापू यांचे पुत्र नारायण साई म्हणाले होते की, अस्वास्थामुळे बापू पोलिसांसमोर हजर होऊ शकत नाही. मात्र त्यांच्या वकिलाने कोर्टात सांगितले की, व्याह्यांच्या निधनामुळे बापू हजर होऊ शकत नाही.