आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श घोटाळाप्रकरणी चव्हाण अडचणीत, सीबीआयने मागितली खटल्याची परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्रात गाजलेल्या आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्यासाठी सीबीआयने राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे परवानगी मागितली आहे.

सीबीआयनुसार, अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध नवे पुरावे सापडल्याने राज्यपालांकडे ही परवानगी मागितली आहे. डिसेंबर २०१३ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल के. शंकर नारायणन यांनी ती नाकारली होती. त्यामुळे सीबीआयला चव्हाणांविरुद्धचे आरोप मागे घेण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.आता सीबीआयने नव्याने परवानगी मागितल्याने आदर्श प्रकरणात चव्हाण पुन्हा अडचणीत आले. २०१० मध्ये घोटाळा उघडकीस आल्यानंतर चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

सूडबुद्धीचे पाऊल
‘भाजप सरकारची ही सूडबुद्धी अाहे. काँग्रेसवर सूड उगवण्यासाठी ही कारस्थाने अाहेत. सीबीअाय निमित्त अाहे. सीबीअायने राज्यपालांकडे मागितलेली परवानगी हे त्याचे उदाहरण.’
अशाेक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष