आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aseem Ahmad Khan, Jitendra Tomar, Kapil Mishra, Sandeep Kumar Could Be New Faces

केजरींकडे अर्थ-ऊर्जा खाते, सिसोदियांना मिळू शकते PWD सह शिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या पद आणि गोपनियतेची शपथ ग्रहण करणार आहेत. त्याआधी त्यांनी त्यांचे मंत्रिमंडळ निवडले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यंदा आपच्या सरकारमध्ये चार नवीन चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. त्यात असीम अहमद खान, जितेंद्र तोमर, गोपाल राय आणि संदीप कुमार यांचा समावेश आहे. याशिवाय मागील सरकारमधील मनीष सिसोदिया, सतेंद्र चौहान यांना पुन्हा संधी दिली जाईल. सिसोदिया यांच्याकडे काही खात्यांसह उपमुख्यमंत्रीपदाचीही जबाबदारी राहाणार आहे. आपने मंत्र्यांची अधिकृत नावे आणि खाते अजून जाहीर केलेल नाहीत.
असे असेल मंत्रिमंडळ
केजरीवाल: मुख्यमंत्री, अर्थ आणि ऊर्जा
मनीष सिसोदिया : उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण
गोपाल राय: परिवहन आणि रोजगार
सत्येंद्र जैन : आरोग्य आणि उद्योग
असीम अहमद खान : अन्न - धान्य पुरवठा
संदीप कुमार: महिला आणि बाल विकास, समाजकल्याण
जीतेंद्र तोमर : कायदा मंत्री
गोयल सभापती आणि वंदना उपसभापती
सूत्रांच्या माहितीनुसार, रामनिवास गोयल यांना सभापती पद मिळेल. वंदना कुमारी या उपसभापती असतील, असे मानले जात आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि आपचे दिल्ली निवडणूक प्रभारी आशुतोष यांनी सांगितले, गुरुवारी उशिरा रात्री पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली त्यात कॅबिनेट मंत्र्याच्या नावावर चर्चा झाली. मात्र, अद्याप यावर निर्णय झाला किंवा नाही हे सांगता येणार नाही. मी आता एवढेच सांगू शकतो, की दिल्ली सरकारचे मंत्रिमंडळ इतर राज्य सरकारांपेक्षा वेगळे असेल.