आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aseem Ahmad Khan, Jitendra Tomar, Kapil Mishra, Sandeep Kumar Could Be New Faces

मुख्यमंत्री केजरीवालांकडे एकही खाते नाही, मनीष सिसोदिया ठरणार शक्तीशाली मंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथग्रहण केली. बरोबर एक वर्षापूर्वी याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते दुसर्‍यांदा या पदावर विराजमान होत आहेत. त्यांच्यासोबत पूर्वाश्रमीचे पत्रकार मनिष सिसोदिया, शायर असलेले असीम अहमद, आणि सामाजिक कार्यकर्ते राहिलेले गोपाल राय यांनी शपथ घेतली. केजरीवाल दिल्लेचे सातवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी दिल्लीत प्रथमच उपमुख्यमंत्रीपद तयार केले आहे. त्यांची कॅबिनेट देशातील सर्वात तरुण कॅबिनेट आहे. त्यांच्या टीममध्ये कमीत कमी वय 40 पेक्षा कमी आहे. यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही.
केजरीवाल यांच्या कॅबिनेटमध्ये कोणाला कोणते खाते
अरविंद केजरीवाल: मुख्यमंत्री (स्वतःकडे एकही खाते ठेवले नाही. सर्व मंत्र्यांच्या कामावर लक्ष ठेवणार)
मनीष सिसोदिया : उपमुख्यमंत्री, अर्थ, शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, शहर विकास, व्हिजिलेंस मंत्रालय
गोपाल राय: परिवहन, कामगार कल्याण मंत्रालय
सत्येंद्र जैन: आरोग्य आणि उद्योग, सार्वजनिक बांधकाम आणि आयएफसी मंत्रालय
आसिम अहमद खान : अन्न-धान्य पुरवठा आणि वन मंत्रालय
संदीप कुमार: महिला आणि बालविकास, समाजकल्याम मंत्रालय
जितेंद्र तोमर: कायदा, पर्यटन, सांस्कृतिक आणि गृहमंत्रालय
रामनिवास गोयल सभापती, वंदना उपसभापती
रामनिवास गोयल यांना सभापती तर, वंदना कुमारी यांची उपसभापदी पदी निवड होण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइडवर जाणून घ्या, मंत्रिमंडळ निवडीची INSIDE STORY, का नाही महिला मंत्री