आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाचा भांडाफोड केल्याने \'CARAVAN\'ला धमक्या, ऑफिसबाहेर RSSचे आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- समझौता बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी असीमानंदने CARAVAN या मासिकाला दिलेल्या मुलाखतीनंतर हे प्रकरण आता गाजायला सुरुवात झाली आहे. असीमानंदने याबाबत स्पष्ट शब्दांत सांगितले, आहे की त्याने CARAVAN मासिकेला कोणतीही मुलाखत दिलेली नाही. दुसरीकडे, या मुलाखतीचे पडसाद उमटू लागले आहेत.
संघाचा या स्फोटामागे हात असल्याचे CARAVANने म्हटल्याने त्यांच्या दिल्लीतील ऑफिसबाहेर आरएसएस आणि हिंदू सेना कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. या मासिकाच्या दिल्ली व मुंबई कार्यालयातही धमकीचे फोन येत आहेत. CARAVAN चे संपादक विनोज जोज यांनी टि्वट केले आहे की, CARAVAN च्या दिल्ली आणि मुंबई ऑफिसमध्ये धमक्या देणार फोन येत आहेत.
CARAVAN च्या फेब्रुवारीच्या अंकात एक मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात असीमानंदने म्हटले आहे, की समझौता स्फोट संघप्रमुख मोहन भागवत यांच्या सहमतीने घडविले होते. 2006 ते 2008 या काळात समझौता एक्स्प्रेस, हैदराबादच्या मक्का मशिदीत, अजमेरमच्या दर्ग्यात व मालेगावमध्ये दोन वेळा असे एकूण 5 वेळा स्फोट घडविले होते.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, असीमानंद आता म्हणत आहे, की एक पत्रकार वकीलाच्या वेशात त्याला भेटण्यासाठी कोर्टात आला होता. आमच्यात जे काही बोलणे झाले त्याची एक हस्तलिखीत नोटसुद्धा आहे. असीमानंदने म्हटले आहे, की मी कधीही मोहन भागवत यांचे नाव घेतले नाही. दुसरीकडे, CARAVANचे संपादक विनोद जोज यांनी म्हटले आहे की, CARAVANमध्ये प्रसिद्ध झालेली मुलाखत सत्य असून, मासिक लवकरच असीमानंदसोबत झालेल्या चर्चेचे ऑडिओ टेप्स रिलिज करेल. तसेच CARAVANचा कोणताही पत्रकार वकीलाच्या वेशात असीमानंदला भेटायला गेला नव्हता. तसेच ही मुलाखत म्हणजे स्टिंग ऑपरेशन प्रकारातली नाही. तर, खुद्द असीमानंदनेच CARAVANला बोलण्याची तयारी दाखवली होती.
पुढे वाचा, काय आहे हे प्रकरण,कोठे झाले होते बॉम्बस्फोट...