आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशाकुमारींची पंजाबच्या प्रभारीपदावर नियुक्ती, वादाला तोंड, भूखंड घोटाळ्यात ठरल्या होत्या दोषी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काँग्रेसच्या सचिव आशाकुमारी यांची रविवारी पंजाब प्रदेश शाखेच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. त्या कमलनाथ यांची जागा घेतील. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत कमलनाथ यांची कथित भूमिका होती, असा आरोप भाजप, शिरोमणी अकाली दल आणि आपने नियुक्तीनंतर केल्याने कमलनाथ यांनी प्रभारीपदाचा राजीनामा दिला होता. आता आशाकुमारी यांच्या नियुक्तीवरूनही वाद निर्माण झाला आहे. एका भूखंड घोटाळ्यात त्या दोषी ठरल्या होत्या.

आशाकुमारी या हिमाचल प्रदेशमधील डलहौसीच्या आमदार अाहेत. त्यांनी काँग्रेस पक्षात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. दरम्यान आशाकुमारी यांना एका भूखंड घोटाळ्यात चंबा न्यायालयाने २६ फेब्रुवारीला दोषी ठरवून एक वर्ष कैद आणि ८० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने मात्र १९ मार्च रोजी त्यांच्या एक वर्ष कैदेच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. या प्रकरणी आशाकुमारी आणि इतर सहा जणांच्या विरोधात दशकभरापासून सुनावणी सुरू होती.

भाजपची टीका
पंजाब भाजपचे नेते विनीत जोशी यांनी आशाकुमारी यांची नियुक्ती दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याची टीका केली आहे. ते म्हणाले की, आधी कमलनाथ आणि आता आशाकुमारी. आशाकुमारी यांना भूखंड घोटाळ्यात न्यायालयाने अलीकडेच एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. काँग्रेसकडे चांगले नेते नाहीत, असे वाटते.
बातम्या आणखी आहेत...