आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक अग्रवाल यांची ‘आप’ला सोडचिठ्ठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक अग्रवाल यांनी मंगळवारी पक्ष दिशाहीन आणि प्रा. लि. कंपनी झाल्याचा आरोप करत पक्षत्याग केला. केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणाले की, पक्षाचे उद्दिष्ट पाहून त्यात प्रवेश केला, मात्र ही उद्दिष्टे धुळीस मिळाली आहेत. यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर माझ्यासारख्या व्यक्तीला पक्षाची कार्यपद्धती खासगी कंपनीसारखी वाटते. पक्षात अभिजन वर्गातील व्यक्तींना प्रोत्साहन दिले जात आहे असे अग्रवाल यांनी सांगितले.

पक्षात नवीन नेते सहभागी होत असताना अनेक संस्थापक सोडचिठ्ठी देत आहेत. दिल्लीत युगांडाच्या महिलांवरील विनयभंग प्रकरणात तत्कालीन कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्यावर आरोप झाल्यानंतर माजी राजनैतिक अधिकारी मधू भादुरी यांनी ‘आप’ सोडला होता. तसेच अश्विनी उपाध्याय यांनीही पक्षातून बाहेर पडणे पसंत केले.