आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चव्हाणांची सर्वोच्च न्यायालयात धाव, ‘आदर्श’मधून नाव वगळण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली, मुंबई - आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आदर्श घोटाळा प्रकरणातील आरोपींच्या यादीतून नाव वगळण्याची त्यांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

राज्यपालांनी अशोक चव्हाण यांच्यावरील कारवाईला परवानगी नाकारल्यानंतर आदर्शमध्ये दाखल झालेल्या आरोपपत्रातून चव्हाण यांचे नाव वगळण्यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, नोव्हेंबरमध्ये ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर चव्हाण यांनी फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने तीही याचिका फेटाळून लावली. अाता सर्वोच्च न्यायालयात २४ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

निलंगेकरांना आरोपी करण्याची मागणी
आदर्श घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना आरोपी करण्याच्या मागणी याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात ६ मे रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी याचिका दाखल केली आहे.