आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashok Chavan News In Marathi, Paid News Issue In Maharashtra

अशोक चव्हाणांची खासदारकी धोक्यात; पेड न्युजप्रकरणी चव्हाणांविरोधात आरोप निश्चित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांना पेड न्यूजप्रकरणी जबरदस्त झटका बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने चव्हाण यांच्याविरोधात आरोप निश्चित केले आहेत. चव्हाण यांच्या विरोधात आज (शुक्रवार) झालेल्या सुनावणीत हे आरोप निश्चित करण्यात आले. कोर्टाने चव्हाण यांच्यावर पाच आरोप ठेवले आहेत. याप्रकरणी येत्या 9 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या खटल्याचा निकाल 20 जून आधीच लागणार असल्याची शक्यता आहे. चव्हाण यांच्याविरुद्ध निकाल लागल्यास त्यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, वादग्रस्त पेड न्यूजप्रकरणी अशोक चव्हाण यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदार संघातून लोकसभेची निवडणूक जिंकणार्‍या चव्हाण यांच्याशी संबंधित पेड न्यूज प्रकरणाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांनी पेड न्यूज दिल्याची तक्रार त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. माधव किन्हाळकर यांनी केली होती. त्यावर हा खटला चालविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, असे म्हणून अशोक चव्हाण यांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब केले आहे.