आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashok Chavan Not Named By CBI In Adarsh Housing Benami Case

सीबीआयच्या कचाट्यातूनही अशोक चव्हाणांची सुटका ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आदर्श घोटाळ्यातील बेनामी मालमत्ता प्रकरणातूनही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सुटका होण्याची चिन्हे आहेत. सीबीआयने गुरुवारी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात चव्हाण यांचे नाव घेतलेले नाही. या आरोपपत्रात सीबीआयने आदर्शच्या 23 वित्त पुरवठादारांची नावे घेतली आहेत. यात संचेती समूह व आदर्श सोसायटीच्या काही सदस्यांसह 22 जणांवर कट रचण्यात सहकार्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यान्वये आदर्श सोसायटीतील 103 पैकी 33 फ्लॅट्समध्ये अवैध लागेबांधे व पदाचा गैरवापर करून फायदा मिळवून देण्याच्या अंगाने सीबीआय तपास करत आहे. महाराष्ट्र सरकारद्वारे स्थापलेल्या समितीने 22 फ्लॅटची बेनामी खरेदी झाल्याचे म्हटले होते.

पवारांकडून पाठराखण
‘आदर्श’ सदनिका प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव आले म्हणजे काय झाले? मुंबईत प्रत्येक पक्षाच्या आमदारांच्या सदनिका आहेत, संकुले आहेत. त्यामुळे कुणा नातेवाइकाला सदनिका दिली असली तरी तो मी भ्रष्टाचार मानत नाही, असे सांगत शरद पवारांनी अशोकरावांची पाठराखण केली. नाशिकमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नातेवाईकांना फ्लॅट्स
आदर्श सोसायटीच्या बांधकामात कथित अनिमियततेच्या प्रकरणाच्या आरोपपत्रात सीबीआयने चव्हाण यांच्यासह 22 जणांची नावे घेतलेली आहेत. आदर्शला अतिरिक्त एफएसआय मिळवून दिल्याचा बदल्यात तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकांना दोन फ्लॅट मिळाल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

पुराव्यांअभावी सुटले?
सीबीआयने गुरुवारी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात चव्हाण यांचे नाव घेतलेले नाही. सीबीआयच्या दाव्यानुसार, आदर्शमधील फ्लॅट खरेदीत अशोक चव्हाण यांच्या आर्थिक व्यवहारांचा मागमूस नाही. तसेच त्यांनी प्रकरणाकडे कानाडोळा केल्याचेही पुरावे नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

दोघांची नावे वगळली
बेनामी मालमत्ता प्रकरणाच्या सह आरोपींत निवृत्त मेजर जनरल टी.के. कौल यांचा समावेश आहे. के.एल. गिडवाणी व ले.कर्नल अमरजित सिंह यांचा मृत्यू झाला असल्यामुळे प्रकरणातून त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. सीबीआयने इतर राजकारणी व उद्योगपतींच्या सहभागाचीही चौकशी केली.

नातेवाईकांना फ्लॅट देणे हा भ्रष्टाचार नाही : शरद पवार
मात्र आता नाव वगळण्याची तयारी : मात्र सीबीआयने या आरोपत्रातून चव्हाण यांचे नाव वगळण्यासाठी उच्च् न्यायालयात बुधवारी याचिका दाखल केली आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडून चव्हाण यांच्यावर खटला चालवण्याची मंजुरी मिळवण्यात सीबीआय अपयशी ठरली होती.