आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ashraf Ghani Meets Modi In Delhi: Full Text Of India Afghanistan Joint Statement

मोदी-घनी भेटीने पाकला संदेश, तीन सामंजस्य करार, दहशतवादाविरोधात एकत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान मोदी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या आजच्या भेटीवरून आणि द्विपक्षीय बोलणी संबंधांवरून भारत आणि अफगाणिस्तानकडून आज पाकिस्तानला दहशतवादी कारवायांना पाठबळ देण्याविरुद्ध कडक इशारेवजा संदेश गेला आहे. अतिरेकी कारवायांचे प्रायोजकत्व घेणाऱ्या पाकला शेजारी देशांकडून मिळालेली ही सणसणीत चपराकच आहे, असे मानले जात आहे. या वेळी भारत -अफगाणिस्तानमध्ये स्वराज यांच्या उपस्थितीत ३ महत्त्वाचे करार झाले.

मोदी- घनी यांच्या बोलणीत दहशतवादावर घानी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, पाककडून सातत्याने त्यांचे राजकारणातील लक्ष्य साध्य करण्यासाठी दहशतवादाचा या प्रदेशात होणारा वापर निषेधार्हच आहे. या वेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय प्रादेशिक सहकार्य संबंध आणि दोन्ही देशांच्या प्रश्नांवर दीर्घ चर्चा केली.

या वेळी मोदींनी अफगाणिस्तानशी १ बिलियन यूएस डॉलर रकमेच्या कामाचे करार केले. बोलणीनंतर भारत-अफगाणिस्तानात ३ महत्त्वाचे करार झाले. या वेळी मोदी यांनीही सार्वभौम, लोकशाही, शांतता, स्थैर्य आणि समृद्ध अफगाणिस्तानसाठी या देशाला सर्वच क्षेत्रांत संपूर्ण सहकार्य करू. उदा. शिक्षण, उद्योग, निर्माण, आरोग्य, कृषी, कौशल्य विकास कार्यक्रम, महिलांचे सशक्तीकरण, ऊर्जा आदींसह लोकशाही संस्थांच्या बळकटीसाठी सदैव मदतीचा हात देईल, असे आश्वासन अफगाणिस्तान व तेथील नेत्यांना दिले आहे. तसेच अफगाणिस्तानला स्वस्त दरातील जागतिक दर्जाची औषधेदेखील पुरविण्याचे आश्वासन या वेळी मोदींनी दिले.
शिवाय तीन करारही उभय देशांत झाले. ते अनुक्रमे नागरी आणि व्यावसायिक प्रकरणात सहकार्य करणे. यासंबंधीचा सामंजस्य करार, शांतत राखणे या कामासाठी बाह्य सीमा वापरणे तसेच भारत-अफगाणिस्तानच्या समान शत्रूंना अतिरेकी कारवायांबाबत एकमेकांना मदत करणे. या करारांमुळे प्रदेशात प्रगती, स्थैर्य, विकास व शांततेचे एक नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी या वेळी व्यक्त केला.
भारत-अफगाणिस्तानचा भागीदारी करार : जयशंकर
भारताचे परराष्ट्र सचिव जयशंकर यांनी या करारांविषयी फारशी माहिती न देता हे धोरणात्मक संबंध आहेत, असे मौनातून जणू सूचित केले. यात अफगाणिस्तानच्या संरक्षण साहित्याच्या पुरवठ्याच्या दीर्घकाळच्या मागणीवरही मौन पाळून दोन्ही नेत्यांच्या सहमतीनंतरच हे शक्य आहे, असे सूचक विधान केले. भारत-अफगाण संबंध हे व्यूहात्मक आणि धोरणात्मक पातळीवर असतील. त्यामुळे त्यांनी अफगाणिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या भेटीच्या प्रश्नावरही मौन बाळगले. अफगाणिस्तानला गव्हाचा तुटवडा जाणवत असल्याने १.७५ टन गहू पुरविण्याच्या ऑफरबद्दल सांगितले.
बातम्या आणखी आहेत...