नवी दिल्ली/गुवाहाटी - आसामच्या एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनींसोबतचे आक्षेपार्ह फोटो सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर अपलोड केले. हे फोटो आता व्हायरल झाले आहेत. मुलींच्या पालकांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीची केवळ चौकशी करून त्याला सोडून दिले.
मुलीला आपल्या मिठीत घेतले
- हे प्रकरण आसाम राज्याच्या हैलाकांडी जिल्ह्याच्या काटीचेर्रा परिसरातील आहे.
- येथे एक शिक्षक फैजुद्दीन लष्करने आपल्या शाळेतील विद्यार्थिनीसोबत वेगवेगळे अश्लील फोटो क्लिक केले आणि फेसबुकवर अपलोड केले.
- या फोटोजमध्ये आरोपी त्या मुलीला आपल्या मिठीत घेताना, आणि अश्लील पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे.
- हे सर्व फोटो क्लासरूममध्येच काढण्यात आले आहेत. या फोटोंत आरोपी शिक्षक एकाच मुलीसोबत दिसून येतोय.
जेव्हा पालकांना हे कळले...
- सोशल मीडियावर हे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्यानंतर त्या मुलीच्या पालकांना हे सर्व कळले. त्यानंतर त्यांनी जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारही नोंदवली, पण पोलिसांनी शिक्षकाची केवळ चौकशी करून त्याला सोडून दिले.
- पोलिसच आरोपी शिक्षकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. त्याला अजूनही अटक झालेली नाही.