आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला, 4 एप्रिलपासून सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाचे लक्ष लागलेल्या केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीच्या तारखा शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. ४ एप्रिल ते १६ मेदरम्यान मतदान प्रक्रिया पूर्ण होईल, तर १९ मे रोजी त्याचे निकाल हाती येतील.
मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा केली. याबराेबरच पाचही राज्यांत आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार केरळ (१४० जागा), तामिळनाडू (२३४), पुड्डूचेरी (३०) येथे एका टप्प्यात मतदान होईल. आसाममध्ये (१२६) दोन टप्प्यांत ४ व ११ एप्रिलला मतदान होईल. पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. ४, ११, १७, २१, २५, ३० एप्रिल व ५ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. परंतु आयोग तांत्रिकदृष्ट्या ४ आणि ११ एप्रिल रोजी पहिला टप्पा मानते. दरम्यान, देशात पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ८० हजार निमलष्करी दलाचे सैनिक तैनात केले जातील. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ, पुड्डूचेरीमध्ये निवडणूक होणार आहे. १०० सैनिकांचा समावेश असलेल्या ७५० ते ८०० तुकड्या सज्ज आहेत. पाचही राज्यांची मागणी पूर्ण करण्याची केंद्राची तयारी आहे, असे गृहराज्यमंत्री राजीव महर्षी यांनी स्पष्ट केले. एप्रिल-मेमध्ये ही निवडणूक आहे. त्यानुसार मतदान प्रक्रिया मुक्त वातावरणात पार पडावी यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. निवडणूक आयोगाचे निरीक्षक संबंधित राज्यातील मतदान केंद्राच्या स्थितीचा आढावा घेतील. त्यांच्या सूचनेनुसार सुरक्षा पुरवली जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे आता रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कोणत्या राज्यात किती जागांवर मतदान..