आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Polling Ends Peacefully In Jammu And Kashmir Jharkhand Records Nearly 60 Voter Turnout

झारखंड, जम्मू-काश्मीरमध्ये तिसर्‍या टप्प्यात साधारण 60 टक्के मतदारांनी बजावला हक्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/श्रीनगर- झारखंड आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात शांततेत मतदान झाले. साधारण 60 टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. झारखंडमध्ये मतदान केंद्रांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या. दुसरीकडे, जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना न जुमानता मतदारांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला.

झारखंडमध्ये साधारण 69 टक्के मतदान झाले. (अंतिम आंकडा अजून प्राप्त झालेला नाही) सिल्लीमध्ये सर्वाधिक 74.77 टक्के आणि रांचीमध्ये सगळ्यात कमी 40.60 टक्के मतदान झाले.
झारखंड राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी पी.के. जाजोरिया यांनी सांगितले की, कोडरमा, बरकट्ठा, बरही, मांडू, हजारीबाग, बरकागांव, रामगढ़, सिमरिया, धनवार, गोमियां, बेरमो, ईचागड, सिल्ली आणि खिजरी विधानसभा मतदार संघात सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली. मतदानाच्या काळीत कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. कांके, हटिया आणि रांची विधानसभा मतदार संघात शांततेत मतदान झाले.
मतदानाच्या तिसर्‍या टप्प्यात दिग्गज नेत्यांचे राजकीय भविष्य मतदान यंत्रात कैद झाले आहे. त्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी, राज्याचे ऊर्जामंत्री राजेंद्र प्रसाद सिंह, राज्याचे जलसंसाधन मंत्री अन्नपूर्णा देवी, विधानसभेचे माजी अध्यक्ष सी.पी. सिंह, भारतीय पोलिस सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी लक्ष्मण प्रसाद सिंह, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुदेश महतो, माजी मंत्री माधवलाल सिंह, माजी मंत्री मनोज कुमार यादव, माजी मंत्री चंद्रप्रकाश चौधरी आणि भाजपच्या उमेदवार सीमा शर्मा यांचा समावेश आहे.
दुसरीकडे, जम्मू काश्मीरमध्ये मतदानावर टाकलेला बहिष्कार आणि कडाक्याच्या थंडीची कुठलीही तमा न बाळगता मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यासह 144 उमेदवारांचे राजकीय भविष्य मतदान यंत्रात कैद झाले आहे. बडगाम, पुलवामा आणि बारामूला जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि लष्कराचे जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते.
जम्मू- काश्मीरमध्ये तिसर्‍या टप्प्यातील मतदानास सकाळी आठ वाजता सुरुवात झा ली होती. दुपारी दोन वाजेपर्यं 43 टक्के मतदान झाले.