आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींपेक्षा 50 टक्क्यांनी अरुण जेटली जास्त श्रीमंत, सुषमा स्वराज यांची संपत्ती झाली दुप्पट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नरेंद्र मोदी, अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी 2016-17 या आर्थिक वर्षात असलेली आपली संपत्ती जाहीर केली आहे. सरकारचे संकेतस्थळ असलेल्या pmindia.gov.in नुसार मोदींनी 2013-14 मध्ये आपली संपत्ती 1.13 कोटी असल्याचे म्हटले होते. ती 3 वर्षात 2 कोटीने वाढली आहे. 2014 पासून आतापर्यंत मोदींची संपत्ती 60 टक्क्यांनी वाढली आहे. जेटली आणि त्यांची पत्नीची एकुण संपत्ती 100 कोटीपेक्षा जास्त आहे. या हिशोबाने जेटलीची संपत्ती मोदींपेक्षा 50 टक्के जास्त आहे. दुसरीकडे सुषमा स्वराज यांची संपत्ती 2013-14 पासून आजपर्यंत दुप्पट झाली आहे. आतापर्यंत सरकारने मोदींसह 14 मंत्र्यांची संपत्ती जाहीर केली आहे. यात डीव्ही सदानंद गौडा, रामविलास पासवान, जेपी नड्डा, अशोक गजपती राजू, प्रकाश जावड़ेकर, मुख्तार अब्बास नकवी आणि अनुप्रिया पटेल यांचा समावेश आहे.
 
मोदींची एकुण संपत्ती
 
वर्ष संपत्ती 
2013-14 1.13 करोड़
2014-15 1.26 करोड़
2016-17 1.73 करोड़
2016-17 2.0 करोड़
- चल संपत्ती : मोदींची संपत्ती एक कोटी रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे. ती 2015-16 मध्ये 73 लाख, 2014-15 मध्ये 26 लाख आणि 2013-14 मध्ये 13 लाख होती. 2013-14 मध्ये मोदींच्या संपत्तीत जवळपास 87 लाखांची वाढ झाली आहे.
- अचल संपत्ती : मोदी यांच्या जवळ गांधीनगरच्या सेक्टर-1 मध्ये एक प्रॉपर्टीत एक चतुर्थांश हिस्सा आहे. त्याचे बाजारमूल्य दरवर्षी एक कोटी रुपये आहे.
- ज्वेलरी :  लोकसभा निवडणूकीदरम्यान निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मोदींनी आपल्याजवळ 1.15 लाखाची ज्वेलरी असल्याचे सांगितले आहे. 2016-17 मध्ये त्यांच्याकडे सोन्याच्या 4 रिंग होत्या. त्याची किंमत 1.28 लाख एवढी आहे.
- कार : त्याच्याजवळ आहे.
- कॅश : त्याच्या खात्यात 1,33,496 रुपये आहेत. तर कॅश इन हॅण्ड 1,49,700 एवढी आहे. याव्यतिरिक्त गुजरातमधील गांधीनगरमध्ये SBI च्या शाखेत 90,26,148 एवढा बॅलेन्स आहे. 
- एलएनटी इन्फ्रा बॉन्ड (टॅक्स सेव्हिंग) मध्ये त्यांनी 20 हजार रुपये गुंतवले आहेत. त्याच्याजवळ 3,96,505 रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रेही आहेत.
 
सुषमांची संपत्ती झाली दुप्पट
वर्ष संपत्ती
2013-14 2.98 करोड़
2014-15 4.54 करोड़
2015-16 5.21 करोड़
2016-17 5.33 करोड़
- चल संपत्ती- सुषमा स्वराज यांच्याकडे सध्या 2.58 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2015-16 मध्ये 2.71 कोटी, 2014-15 मध्ये 2.37 कोटी आणि 2013-14 मध्ये 1.83 कोटी एवढी संपत्ती होती. त्यांच्या संपत्तीत 2013-14 पासून आतापर्यंत 75 लाखांची वाढ झाली आहे. 
- अचल संपत्ती- त्यांची 2016-17 मध्ये घोषित संपत्ती 2.75 एवढी आहे. हरियाणात शेती आणि दिल्लीत एक फ्लॅट आहे. मागील तीन वर्षात त्यांची संपत्ती 2.75 एवढी होती.
- दागिने- त्यांच्याकडे 27.93 लाखाचे दागिने आहेत. 2015-16 मध्ये त्यांच्याकडे 30.48 लाखाचे दागिने होते. त्यापुर्वी 2014-15 मध्ये त्यांच्याकडे 23.79 लाख रुपयांचे दागिने होते. 2013-14 मध्ये ती 8.36 लाख एवढी होती. तीन वर्षी त्यांची संपत्ती दुप्पट झाली आहे.
 
- सगळ्यात श्रीमंत मंत्र्यांमध्ये जेटली
वर्ष संपत्ती 
2013-14 75.70 करोड़
2014-15 67.01 करोड़
2015-16 60.99 करोड़
2016-17 100 कोटीपेक्षा जास्त
- अर्थमंत्री अरुण जेटली मोदी सरकारमधील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहेत. जेटली आणि त्यांच्या पत्नी संगीता जेटलींची एकुण संपत्ती 100 कोटींपेक्षा जास्त आहे.
- चल संपत्ती : जेटली यांची सध्याची चल संपत्ती 29.27 कोटी आहे. त्यात बॅंकेतील कॅश, पीपीएफ, कॅश इन हॅन्डचा समावेश आहे. 2015-16 मध्ये त्यांची चल संपत्ती 29 कोटी एवढी होती. तर 2014-15 मध्ये 31.76 कोटी एवढी होती. 2013-14 मध्ये 32.07 एवढी होती. 2013-14 पासून आजपर्यंत त्यांची संपत्ती 2.80 कोटी रुपयांनी कमी झाली आहे.
अचल संपत्ती : अर्थमंत्र्यांची 2016-17 मध्ये घोषित एकूण अचल संपत्ती 80 कोटींहून जास्त आहे. यात हरियाणातील फरिदाबाद, गुडगाव, पंजाब, गुजरात आणि दिल्लीतील फ्लॅट्स सामील आहेत. या प्रॉपर्टीजच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने त्यांच्या संपत्तीतही वाढ होत आहे.
ज्वेलरी: जेटलींकडे सध्या 3154 ग्रॅम सोने आणि 15.80 किलो चांदी आहे. याशिवाय 45 लाखांचे हिरेही आहेत. सोने-चांदी आणि हिऱ्यांचे सध्याचे भाव पाहता त्यांची किंमत 1.29 कोटी रुपयांहून जास्त आहे. 2013 ते 2016 दरम्यान जेटलींकडे 5630 ग्रॅम सोने आणि 15 किलो चांदी होती. 2013 पासून ते आतापर्यंत 45 लाखांचे हिरे आहेत.
कार : जेटलींकडे सध्या 1.93 कोटी मूल्याच्या 4 कार आहेत. यात दोन मर्सिडीझ बेंझ, एक फॉर्च्युनर आणि एक अकॉर्ड सामील आहे. वर्ष 2014-15 मध्ये त्यांच्याकडे 86 लाख रुपये मूल्याची एक बीएमडब्ल्यू कारही होती, तर 2013 मध्ये या सर्व कारसह 1.03 कोटींची एक पोर्शे कारही होती, ज्याचा या वेळी उल्लेख केलेला नाही.
गुंतवणूक : जेटली यांनी एन्प्रो ऑइल्स लिमिटेडमध्ये 9 कोटी आणि डीसीएम श्रीराम कन्सॉलिडेटेड लिमिटेडमध्ये 8 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यांनी पीपीएममध्ये 29,37,333 रुपयांची गुंतवणूक केली आहे
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी माहिती
 
 
बातम्या आणखी आहेत...