आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assocham Says, Rice Production Be Down In This Year

या वर्षी तांदळाचे उत्पादन घटेल : असोचेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- या वर्षी खरिपाच्या सीझनमध्ये तांदळाचे उत्पादन अंदाजापेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचे मत उद्योग संघटना असोचेमच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. सरकारच्या वतीने खरिपामध्ये तांदळाचे उत्पादन ९.०६ कोटी टन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मान्सून खराब राहिल्यामुळे हे उद्दिष्ट साध्य होणे शक्य नसल्याचे मत असोचेमने व्यक्त केले. पूर्ण वर्ष २०१५-१६ दरम्यान तांदळाचे उत्पादन १०.३ कोटी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मान्सूनच्या पावसामुळे तांदूळ उत्पादनावर परिणाम झाला असल्याचे असोचेमने म्हटले आहे.
सरकारच्या वतीने रेशन आणि अन्य योजनांच्या माध्यमातून तांदळाचे वितरण करण्यात येते. असे असले तरी उत्पादनात आलेल्या घटीचा परिणाम बाजारावर लवकरच दिसून येईल, असे मत असोचेमने नोंदवले आहे. तांदळाच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच मागणी प्रमाणे पुरवठा कायम ठेवण्यासाठी सरकारने लवकर प्रयत्न करणे आवश्यक असल्याचा सल्लादेखील असोचेमने दिला आहे. काही दिवसांपासून बाजारात कांदा, टाेमॅटाे यांच्यासह काही भाज्या, डाळी, मोहरीचे तेल यांच्या किमती वाढलेल्या आहेत. कांदा ८० रुपये तर तूरडाळ २०० रुपये किलोवर गेली होती.

किमतीचा अहवाल विरुद्ध : बासमती तांदूळ सोडला तर दुसऱ्या तांदळाचे घाऊक बाजारातील भाव गेल्या वर्षीच्या ३० रुपयांच्या तुलनेत २५ रुपये किलोच्या जवळपास आहे. प्रीमियम बासमती तांदळाचे भावदेखील ३० टक्क्यांपर्यंत कमी आहे. गेल्या वर्षी ६२ ते ६५ रुपयाच्या तुलनेत सध्या तोच तांदूळ ४४ ते ४५ रुपये किलोवर विक्री होत आहे.

साठा जास्त :एफसीआयच्या आकडेवारीनुसार जूनमध्ये १६४.८३ लाख टन तांदळाचा साठा होता. नियमानुसार १ जुलैला १३५.४ लाख टन आणि १ ऑक्टोबरला १०२.५ लाख टनाचा साठा असायला हवा.