आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • At Least 107 Dead In Crane Collapse In Mecca's Grand Mosque

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मक्का दुर्घटना; मृतांमध्ये दोन भारतीय महिला; मृतांचा आकडा १०७ वर गेला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृतांमध्ये दोन भारतीय महिलांचाही समावेश आहे. - Divya Marathi
मृतांमध्ये दोन भारतीय महिलांचाही समावेश आहे.
जेद्दा/ नवी दिल्ली - मक्का येथील मुख्य मशीद अलम हरममध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या क्रेन दुर्घटनेतील मृतांमध्ये दोन भारतीय महिलांचाही समावेश आहे. या महिलांची ओळख पटली असून केरळमधील मौमीना इस्माइल व पश्चिम बंगालमधील मोनिजा अहमद अशी त्यांची नावे आहेत. या दुघटनेतील मृतांचा आकडा १०७ पर्यंत पोहोचला असून दुघटनेत १९ भारतीय जखमी झाले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी सांगितले, जखमींवर तेथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जेद्दा येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी मदतीसाठी मक्केला पोहोचले आहेत. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वादळी वारे व पावसामुळे क्रेन खाली पडल्याने छताचा भाग कोसळला व दुघटना घडली. त्यात १०७ जण मृत्युमुखी पडले . तर २०० पेक्षा जास्त भाविक जखमी झाले. दरम्यान, मक्का येथील गव्हर्नर खालेद अल फैसल यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रातील तीन हज यात्रेकरू जखमी
दरम्यान या दुर्घटनेत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, तेलंगणातील प्रत्येकी तीन, दिल्ली व पश्चिम बंगालमधील दोन - दोन तर पंजाब, बिहार व आसामातील एक यात्रेकरू जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे हज यात्रेवर कोणताही परिणाम होणार नाही. मशिदीचा तुटलेला भागही लवकरच दुरुस्त केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हज यात्रा २१ ते २६ सप्टेंबरदरम्यान होणार आहे.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...