आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Atal Bhihari Vajpayee's Niece Karuna Shukla Joins Congress

अटलबिहारी वाजपेयींची भाची करुणा शुक्ला यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाची आणि भाजपच्या माजी खासदार करुणा शुक्ला यांनी आज (गुरुवारी) कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांच्या उपस्थिती करुणा शुक्ला यांनी प्रवेश केला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नेत एका पक्षातून दुसर्‍या पक्षात अक्षरश: उड्या घेताना दिसत आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगदंबिका पाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जगदंबिका पाल यांच्या भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेसला प्रचंड धक्का बसला आहे.

जगदंबिका पाल हे डोमरीयागंज येथील खासदार आहेत. पाल यांच्या भाजप प्रवेशाची मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. जगदंबिका पाल यांनी 1998 मध्ये तीन दिवसांसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते.