आग्रा- देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीं यांची जन्मभूमी बटेश्वर हे आग्रा शहरापासून जवळच आहे. त्यामुळे वाजपेयी यांचे आग्रा शहराशी असलेले नाते फार जुने आहे. 'दगडफेक तर आयुष्यात बर्याचदा अनुभवली परंतु, फुलांचा मारही आगर्यात खावा लागला होता' असे वाजपेयी नेहमी सांगतात.
अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये झाला होता. वाजपेयी आज (बुधवारी) 89 वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या वाजपेयी यांची प्रकृती खालावली आहे. आग्रा हे वाजपेयींचे सर्वात आवडते शहर. त्यामुळे आजही ते आग्राविषयीच जास्त बोलतात.
वाजपेयी यांच्या सान्निध्यात बराच काळ राहिलेले हरद्वार दुबे सांगतात, की 1987 साली वाजपेयी भाजपचे राष्ट्रीय अधिवेशनासाठी आग्रा येथे आले होते. अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी मोठी रॅली काढण्यात आली होती. पुष्पगुच्छ आणि फुलमाळांनी वाजपेयींचे भव्य स्वागत करण्यात आले होते. आग्रा शहरातील जनतेचे प्रेम त्यांना आजही सुखद आठवण करून देते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, चाट आणि जिलेबीचे चाहते होते वाचपेयी...