आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Athankot Terror Attack: Jihadis Made Dry Runs At Pakistani Air Base, Intelligence Sources Say

पठाणकोट: ऑपरेशन संपले, ISI ने हल्‍ला केल्‍याचा US अधिकाऱ्याचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट एअरबेसवरील सुरक्षा - Divya Marathi
पठाणकोट एअरबेसवरील सुरक्षा
नवी दिल्ली - भारतीय गुप्तचर यंत्रणेने दावा केला आहे, की पठाणकोटवर हल्ला करण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानातील एका एअरबेसवर कित्येकदा मॉक ड्रिल केले होते. हल्ल्यादरम्यान थकवा येऊ नये आणि आजारी पडू नये यासाठी ते गोळ्या घेत होते. दहशतवाद्यांच्या तीन ट्रेनर्सचीही ओळख पटली आहे. शनिवारी मध्‍यरात्रीपासून सुरू असलेले हे कॉम्बिंग ऑपरेश आज (बुधवार) संपले. दरम्‍यान, या हल्‍ल्‍यामध्‍ये आयएसआएसचा हात असल्‍याचा दावा यूएस अधिकाऱ्याने केला.

हल्ल्यात पाक आर्मी आणि आयएसआयचा हात कसा... कोण होते ते तीन ट्रेनर्स
- गुप्तचर संस्थाच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने हवाई दलाच्या तळावर हल्ला केला होता आणि ते फायरिंग करत होते त्यावरुन त्यांना एका हवाई दलाच्या तळाची चांगली माहिती होती.
- दहशतवाद्यांना हल्ल्याची संपूर्ण ट्रेनिंग देण्यात आलेली होती. यावरुन पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयचा यात हात असण्याची दाट शक्यता आहे.
- एअरबेसची सुरक्षा कशी भेदायची याची त्यांना अनेकदा प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून माहिती दिली असण्याची शक्यता आहे.
- दहशतवाद्यांनी एके-47 रायफल्सचे आधुनिक व्हर्जन यूबीएलचा (अंडर बॅरल गन) वापर केहा होता, ज्याचा वापर मोर्टर लॉन्चरम्हणूनही उपयोग करता येत होता.
- सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी पाकिस्तान मेड अँटी-कफ आणि पेनकिलर्स टॅब्लेट्स घेत होते.
- काउंटर टेरर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांच्या मृतदेहाजवळ औषधी सापडली आहे. ती सर्व पाक बनावटीची आहे. भारतात अशी औषधे मिळत नाही.

आता एअरबेसवर काय स्थिती
- कॉम्बिंग ऑपरेशन संपले आहे.
- मंगळवारी संरक्षण मंत्र्यांनी कॉम्बिंग ऑपरेशन अजून चार दिवस सुरू राहाण्याची शक्यता वर्तवली.
- 6 दहशतवादी ठार झाले तर 7 जवान शहीद झाले.

अतिरेक्यांकडे पाक बनावटीची उपकरणे
संरक्षण मंत्रीमनोहर पर्रीकर लष्कर आणि हवाई दल प्रमुखांसोबत पठाणकोट हवाई दल तळावर पोहोचले. ते म्हणाले की, शनिवारी पहाटे 3.30 वाजेपासून ते रविवारी सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत असे 40 तास चकमक चालली. दहशतवाद्यांकडे पाकिस्तानी बनावटीची उपकरणे सापडली. आत मोठ्या संख्येने जिवंत बॉम्ब आहेत. त्यामुळे मृतदेह हस्तगत करण्यास उशीर लागला. सहाव्या दहशतवाद्याचा मृतदेह हस्तगत केलेला नाही. त्याच्याकडे स्फोटके असू शकतात. ज्या जवानांनी प्राणांची आहुती दिली, त्यांना युद्ध शहिदांचा दर्जा देण्यात येईल.
(संरक्षणंत्री पर्रीकरांनी मान्य केले चूक झाली.. वाचा पूर्ण बातमी)