आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६०% ATM बंदच; सर्व कार्यरत होण्यास लागतील २-३ आठवडे, तिसऱ्या दिवशीही बँका व एटीएमसमोर रांगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीनंतर शनिवारीही रोकड, विशेषत: छोट्या नोटांची समस्या कायम होती. मेटाकुटीला आलेल्या लोकांनी केरळमध्ये बँकेची तोडफोड केली तर हरियाणा व गुजरातमध्ये अनेक ठिकाणी गर्दी पांगवण्यासाठी लाठीमार करण्यात आला. पैसे नसल्यामुळे मध्य प्रदेशातील छत्तरपूरमध्ये लोकांच्या जमावाने स्वस्त धान्य दुकानच लुटले. देशभरात अद्याप ६० टक्के एटीएम बंद पडलेले आहेत. जे चालू आहेत त्यांच्यातील नोटा फारच लवकर संपू लागल्या आहेत. ही समस्या आणखी काही दिवस कायम राहील. अर्थमंत्री अरुण जेटली म्हणालेे की, सर्व दोन लाख एटीएम सुरू होण्यासाठी दोन-तीन आठवडे लागतील.

पत्रकार परिषदेत जेटली म्हणाले, सर्व एटीएमचे नव्या नोटांनुसार तांत्रिक आणि वेगाने कॅलिब्रेशन केले जात आहे. एक-एक करून एटीएम मशीनमध्ये बदल करावा लागत आहे. रिझर्व्ह बँकेच्या चार हजार करन्सी चेस्टमध्ये नोटांची अजिबात कमतरता नाही. बँकांतही मोठ्या नोटा उपलब्ध आहेत. मात्र लोक छोट्या नोटा मागत आहेत. लोकांनी नोटा बदलण्याऐवजी त्या आपल्या खात्यात जमा कराव्यात, असे आवाहनही जेटली यांनी लोकांना केले आहे. जुन्या नोटा बदलण्यासाठी देण्यात आलेली ३० डिसेंबरची मुदत वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


बँकांत जमा झाले २ लाख कोटी रुपये
जेटलींनी सांगितले की, बँकांमध्ये शनिवारी दुपारपर्यंत २ लाख कोटी रुपये जमा झाले होते. एकट्या एसबीआयमध्ये ४७,८६८ कोटी रुपये जमा झाले. सर्व बँकांमध्ये जमा रकमेच्या २० टक्के एकट्या स्टेट बँकेत जमा झाले .
२००० च्या बनावट नोटाही आल्या
तीन दिवसांच्या आतच २००० रुपयाच्या बनावट नोटाही बाजारात आल्या आहेत. अशा दोन घटना पंजाबच्या भिखिविंड व बंगळुरूमध्ये समोर आल्या. स्कॅन करून त्यांचे प्रिंटआऊट काढण्यात आल्या, असे मानले जात आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, नोटबंदीवर काय म्हणाले केजरीवाल...
बातम्या आणखी आहेत...