आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Atomic energy department publishes manmohan as pm

बुकलेट मोदी सरकारचे, फोटो मात्र मनमोहन सिंगांचा, मंत्रीमहोदय चिडीचूप!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी सरकारने छापलेल्या बुकलेटवर मनमोहन सिंग यांचा उल्लेख पंतप्रधान म्हणून केला आहे. - Divya Marathi
मोदी सरकारने छापलेल्या बुकलेटवर मनमोहन सिंग यांचा उल्लेख पंतप्रधान म्हणून केला आहे.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारच्या कामगिरीबाबत एक बुकलेट प्रकाशित करण्यात आले आहे. प्रत्येक मंत्रालयाने आपापली कामगिरी या बुकलेटमध्ये दिली आहे. मात्र, मोदी सरकारच्या कामकाजाबबात एका बुकलेटने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एटॉमिक एनर्जी डिपार्टमेंटच्या वर्षभराच्या कामगिरीबाबत छापलेल्या बुकलेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी मनमोहन सिंह यांना पंतप्रधान म्हणून शास्त्रज्ञांसमवेत दाखवले आहे.
भाभा एटॉमिक रिसर्च सेंटरच्या बुकलेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांचे नाव अथवा फोटोही या बुकलेटमध्ये पाहायला मिळत नाही. शनिवारी जेव्हा राज्य मंत्री जितेंद्र सिंह याची माहिती मिळाली तेव्हा खाली पहावे लागले.
काय म्हणाले मंत्रीमहोदय?

जेव्हा पत्रकारांनी याबाबत छेडले असता, पत्रकार परिषदेत पीआयबीच्या अधिका-यांनी ही मानवी चूक असल्याचे सांगत पुढचे बोलणे टाळले. यावर मंत्री जितेंद्र सिंह यांना विचारले असता त्यांनी जेव्हा प्रेस अधिकारीच मानवी चूक सांगत असतील तर मी यावर काय बोलू?
हरिभाई चौधरींच्या वक्तव्याने उडाली खळबळ-
संसदेच्या मागील सत्रात गृह राज्यमंत्री हरिभाई चौधरी यांच्या एका वक्तव्याने खळबळ माजली होती. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, मला माहित नाही की दाऊद इब्राहिम कोठे आहे. त्यानंतर त्यांनी म्हटले मंत्रीमहोदयानी चुकून वक्तव्य केल्याचे म्हटले होते. याचे सारे खापर अधिका-यांवर फोडले होते. सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते की, अधिका-यांनी मागील सरकारच्या वतीने बनविण्यात आलेले वक्तव्य जसेच्या तसे मंत्रीमहोदयाला दिल्यामुळे चुकीचे वक्तव्य बोलले गेले.
पुढे स्लाईडसद्वारे पाहा, संबंधित PHOTOS...