आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attack On Kanhaiya Kumar Pre Planned National Humane Rights Commission

कन्हैयावर हल्ला पूर्वनियोजितच, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा पाेलिसांवर ठपका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेतील जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमारवर दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्ट परिसरात झालेला हल्ला पूर्वनियोजित होता. पोलिसांच्या बेपर्वाईमुळेच तो झाला, असे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने (एनएचआरसी)म्हटले आहे. हा हल्ला झालाच नसल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा वैद्यकीय अहवालानेही खोटा ठरवला आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने कन्हैयाचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाकडे पाठवल्यानंतर त्याने तेथे अर्ज केला.

पोलिस कोठडी संपल्याने बुधवारी कन्हैयाला पतियाळा हाऊस कोर्टात नेताना वकिलाच्या वेशातील लोकांनी हल्ला, शिवीगाळ केली. पोलिसांच्या उपस्थितीत त्याला मारहाण केली. पोलिसांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. कन्हैयाने हल्लेखोरांना ओळखूनही काही कारवाई केली नाही. कन्हैया व त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेला गंभीर धोका आहे, असे एनएचआरसीच्या सत्यशोधन समितीने म्हटले आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी हल्ल्याचा आरोप चुकीचा असल्याचे म्हटले होते. त्यांचा हा खोटारडेपणा वैद्यकीय अहवालामुळेही उघडा पडला आहे. दिल्लीत वकिलांनी इंडिया गेटपर्यंत ‘राष्ट्रद्रोह्यां’च्या विरोधात मोर्चा काढला.