आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arun Shourie Says On Demonetisation Suicide Too Is A Bold Step; Talk About GDP Decline

नोटबंदी आत्महत्येसमान, फक्त अडीच लोक सरकार चालवतात; अरुण शौरींचा मोदी सरकारवर वार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - यशवंत सिन्हानंतर आता अरुण शौरींनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली आहे. नोटबंदी हा आत्मघाती निर्णय असल्याचे ते म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री शौरी म्हणाले की सरकार भलेही नोटबंदीला साहसी निर्णय म्हणत असेल मात्र हा निर्णय आत्महत्या करण्यासारखा होता. सध्याचे सरकार हे फक्त अडीच लोक चालवत असल्याचे सांगत, केंद्र सरकारचा खरमरीत समाचार घेतला. काही दिवसांपूर्वीच माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ढासळत्या अर्थव्यवस्थेत नोटबंदीने आगीत तेल ओतण्याचे काम केल्याचे म्हटले होते. 
 
अरुण शौरी म्हणाले- मोदी सरकारचा फक्त खुलाशांवर जोर 
- शौरी म्हणाले, 'सरकारने नोटबंदी करताना जे तर्क दिले होते त्यावर ते आजही कायम आहेत का? काळे धन पूर्णपणे आता व्हाइट झाले का? दहशतवादी आजही हल्ला करत आहे. सरकारकडे सांगण्यासारखे आज काहीच नाही.'
- अमित शहांनी तांत्रिक कारणांमुळे मंदीचे वातावरण असल्याचे म्हटले होते. त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना शौरी म्हणाले, 'शहा काय प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आहेत का? तुम्ही सरकारी आकडे फार दिवस लपवून ठेवू शकत नाही.' 
- केंद्र सरकार कोणाचेही ऐकून घेत नसल्याचे सांगत शौरी म्हणाले, 'जे सरकार चालवत आहेत त्यांना सत्य जाणून घेण्याची आणि कोणाची सूचना ऐकण्याची इच्छा नाही.'
 
हे अडीच लोक चालवतात सरकार 
- शौरी म्हणाले, 'हे सरकार फक्त अडीच लोकांचे आहे. अडीच लोकच सरकार चालवत आहे. एक नरेंद्र मोदी, दुसरे अमित शहा आणि तिसरे घरचे वकील आहे. यांच्याकडे विशेष क्षमता नाही. त्यांच्या आसपासही जे लोक आहेत तेही फार वकूबाचे नाही.'
- 'हे लोक एका बंद खोलीत बसले आहेत. बाहेर काय सुरु आहे ते त्यांना ऐकायला जात नाही. आरबीआयने लघु आणि मध्यम उद्योजकांना संकटात टाकले आहे.'
- शौरी म्हणाले, 'यशवंत सिन्हा, पी. चिदंबरम आणि इतरही अर्थतज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. इकॉनॉमिक सर्व्हे, आरबीआय सर्व्हेमधूनही सत्य समोर येत आहे. जीडीपी घसरुन 3.7वर गेला. 2015-16 मध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्शन 9% होते, या वर्षी एप्रिल-जुलै दरम्यान त्यात घसरण होऊन थेट 1.7% वर पोहोचले आहे. ही चिंतेची बाब आहे.'
बातम्या आणखी आहेत...