आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम खटल्‍यातील साक्षिदाराचा मृत्‍यू; वाचा साक्षीदार कसे आहेत संकटात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरेली – तथाकथित धर्मगुरू आणि बलात्‍काराच्‍या आरोपात करागृहात असलेल्‍या आसाराम बापू याच्‍या खटल्‍यातील प्रमुख साक्षीदार असलेले कृपाल सिंह यांच्‍यावर काल (शनिवारी) दोन अज्ञात व्‍यक्‍तींनी गोळीबार केला. ही घटना शरांजपूर जिल्ह्यातील पुवायन गावात घडली. बरेली येथील रुग्‍णालयात रात्री उशिरा त्‍यांना मृत्‍यू झाला. आतापर्यंत आसारामच्‍या याच्‍या खटल्‍यातील नवव्‍या साक्षीदारवर प्राणघातक हल्‍ला झाला आहे. दरम्‍यान, आता यातील तीन साक्षीदरांचा मृत्‍यू झाला आहे.
उत्तर प्रदेशातील शहाजहानपूरमधील एका युवतीने आसाराम बापू यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्‍यात कृपाल सिंह हे प्रमुख साक्षीदार आहेत. ते शुक्रवारी रात्री आठ वाजता दुचाकीने घरी निघाले जाते. दरम्‍यान, त्‍यांचावर गोळीबार झाला. त्‍यांच्‍या कंबरेला गोळी लागली होती. मागच्‍याच महिन्‍यात त्‍यांनी आसारामच्‍या विरोधात साक्ष दिली होती.
दोन सुरक्षा रक्षक तरीही हल्‍ला
कृपाल सिंह यांच्‍या आरासरामकडून हल्‍ला होऊ शकतो, हे माहिती असल्‍याने न्‍यायालयाच्‍या आदेशाने त्‍यांना दोन सुरक्षा रक्षक दिले गेले होते. पण, तरीही त्‍यांच्‍यावर हल्‍ला झाला.
पीडित मुलीने केली सीबीआय चौकशीची मागणी
ज्‍या मुलीवर अासारामने बलात्‍कार केल्‍याचा आरोप केला त्‍या पीडित मुलीने सीबीआय चौकशी करण्‍याची मागणी केली आहे. शिवाय आसाराम तिच्‍या कसा अत्‍याचार करत होता, याची आपबिती सांगितली.
नेकमे काय आहे प्रकरण
आसारामने त्‍याच्‍या जोधपूरच्या आश्रमात एका सोळा वर्षांच्या मुलीच्‍या अंगातून भूत काढण्‍याच्‍या उपचाराखाली बलात्‍कार केल्याचा आरोप तिच्‍या पालकांनी ऑगस्‍ट 2013 मध्‍ये केला. दरम्‍यान, वैद्यकीय चाचणीतही हे स्‍पष्‍ट झाले. त्‍यानंतर दिल्ली पोलिसांनी आसारामला भारतीय पीनल कोड ३४२, ३७६, ५०६, ज्युव्हेनाइल जस्टिस अॅक्ट तसेच प्रोटक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस अॅक्टखाली 1 सप्‍टेंबर 2013 ला अटक केली.
इतर दोन साक्षीदार सुर‍क्षित स्‍थळी
या खटल्‍यातील साक्षीदारांवर एकापाठोपाठ हल्‍ले होते आहेत. त्‍यामुळे आता इतर दोन साक्षीदारांनी सुर‍क्षित स्‍थळी धाव घेतली. यामध्‍ये महेंद्र चावला यांच्‍यासह गुन्हे अन्वेषण विभागाच्या एक यांचा समावेश आहे.

या दोन साक्षीदारांचा झाला मृत्‍यू

15 जानेवारी 2015 ला अखिल गुप्ता यांची मुजफ्फरनगरमधील नवी मंडी परिसरात गोळी घालून हत्या करण्यात आली तर अमृत प्रजापती यांच्यावर २३ मे रोजी गोळीबार झाला होता. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. 10 जून 2014 ला त्‍यांचा मृत्‍यू झाला.

2009 मध्‍येच भांडाफोड करणा-या शिष्‍यावरही हल्‍ला
बापूचाच शिष्य राजू चांडक याने वर्ष 2009 मध्‍ये आसारामला एका भक्त स्त्रीसोबत अश्लिल चाळे करतात पाहिले. दरम्‍यान, जे पाहिले ते त्याने डिसेंबर २००९ मध्ये न्यायलयात एका प्रतिज्ञापत्र लिहून दिले. त्यामुळे साबरमती येथील रामनगरात राजूवर दोन अज्ञात इसमांनी हल्ला केला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदला आणि राजू चांडक याच्यावरील खुनीहल्ल्याचा प्रयत्न केल्याबद्दल आसारामवर अजूनही खटला सुरू आहे.
लग्‍नापूर्वीच आसारामला त्‍याच्‍या सास-याने बेदम चोपले होते. वाचा पुढील स्‍लाइडवर....