आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसारामच्‍या खटला प्रकरणात सर्व साक्षीदारांवर एकाच पद्धतीने हल्‍ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली – कथित धर्मगुरू आसाराम याच्‍या खटल्‍यातील नऊ साक्षीदारांवर आतापर्यंत गोळीबार झाला. यापैकी तिघांना मृत्‍यू झाला. धक्‍कादायक बाब म्‍हणजे दोन साक्षीदारांवर सारख्‍याच पद्धतीने हल्‍ला झाला असून, देशी बनावटीच्‍या ए-12 बोर गणमधून गोळी झाडली गेली आहे. त्‍यामुळे पोलिस याचा एकत्रित तपासत करत आहेत, अशी मा‍हिती पोलिसांनी माध्‍यमांना दिली.
11 जानेवारीला साक्षीदार अखिल गुप्ता यांच्‍यावर मुझफ्फरनगर येथे गोळ्या झाडल्‍या होत्‍या. तर १० जुलैला कृपाळ सिंह यांच्‍यावरही त्‍याच पद्धतीने शहाजानपूर येथे गोळ्या झाडल्‍या. दोन्‍ही घटनेतील हल्‍लेखोर हे दुचाकीवरून आले होते आणि त्‍यांनी कंबरेखाली गोळी मारली. त्‍यामुळे दोन्‍ही प्रकरणातील हल्‍लेखोर हे एकच आहेत, याला पुष्‍ठी मिळाली असून, पोलिस त्‍या दिशेने तपास करत आहेत.