आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Atterny General G.E. Wahanwati Apology To Supreme Court

महाधिवक्ता जी.ई. वहानवटी यांनी मागितली सर्वोच्च न्यायालयाची माफी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणाच्या सुनावणीवेळी मंगळवारी महाधिवक्ता जी. ई. वहानवटी यांचा संयम सुटला. यानंतर आपल्या चुकीची जाणीव झालेल्या वहानवटी यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली.
न्यायपीठाचा अनादर करण्याचा आपला कोणताही उद्देश नव्हता. काल आपल्याकडून जे काही झाले त्याबद्दल मी माफी मागतो, असे वहानवटी यांनी न्या. आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाला सांगितले. यानंतर न्यायालयाने केलेल्या टिप्पणीत म्हटले, ‘मला वाटले, वातावरण आणि उष्णतेमुळे तसे झाले असावे.’


कोळसा प्रकरणातील सर्व दस्तऐवज सादर न केल्याबद्दल वहानवटी यांच्याकडे मंगळवारी विचारणा करण्यात आली होती. त्यावर वहानवटी यांनी, ‘मी सर्वकाही डोक्यात घेऊन येऊ शकत नाही,’ असे म्हटले होते. सरकारच्या या प्रकरणातील भूमिकेत विरोधाभास आहे, असे न्यायालयाने फटकारले होते. त्यावर वहानवटी यांनी न्यायालयाने विचारलेल्या सर्व त्रुटींवर खुलासा करणे त्रासदायक आणि कठीण आहे. मी सर्वकाही डोक्यात घेऊन येऊ शकत नाही. मी एखाद्या मुद्द्यावर युक्तिवाद करत असताना अन्य विषयाचा दुसरा मुद्दा उपस्थित होतो. मी युक्तिवाद कसा पुढे सुरू ठेवू, असे त्यांनी म्हटले होते. न्यायालयाने वहानवटी यांच्याकडे 218 खाणपट्टे वाटपाची सविस्तर माहिती मागितली होती. यानंतर वहानवटी यांचा संयम सुटला.