आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Atterny Gernal Give Resignation In The Name Of Sonia, Fake Calls

सोनियांच्या नावे मागितला महाधिवक्त्यांचा राजीनामा, बनावट कॉल्सचा पराक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - महाधिवक्ता गुलाम ई. वहानवटी यांना सोनिया गांधी यांच्या नावाने कोणी तरी बनावट कॉल केला. फोन करणा-याने वहानवटी यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत जबाबदारीने काम करण्याचा सल्ला दिला आणि राजीनामा देण्याबाबतही विचार करावा, असे फोनवर सांगितले.


सोनिया गांधी यांच्या नावाने फोन आल्यामुळे तो गांभीर्यपूर्वक घेणे स्वाभाविक होते. महाधिवक्त्यानेदेखील तेच केले. राजीनाम्याच्या सल्ल्याचा असल्यामुळे काही वरिष्ठ अधिका-यांना घेऊन वहानवटी काँग्रेस नेत्यांना भेटायला निघाले. सोनिया गांधी असे करू शकत नाहीत, असे काँग्रेस नेत्यांनी वहानवटी यांना सांगितले. याबाबत संशय आल्याने वहानवटींनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वहवानवटींना बनावट कॉल आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.


सोनिया होत्या अमेरिकेत
तक्रारीनुसार वहानवटी यांना जेव्हा फोन आला तेव्हा सोनिया गांधी यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते. फोनवरील महिलेने सांगितले की, ‘मी सोनिया गांधी यांच्या कार्यालयातून बोलत आहे आणि त्या तुमच्याशी बोलू इच्छित आहेत.’ लगेच दुसरी महिला फोनवर बोलली. तिचा आवाज सोनिया गांधी यांच्यासारखाच होता.


माजी अधिकारी, काँग्रेसच्या नेत्यावर संशय
या प्रकरणात पीएसयूच्या माजी महिला अधिकारी, एक विधी अधिकारी आणि एका काँग्रेस नेत्यावर संशय आहे.वहानवटी यांना कॉल करण्यात आला होता तो क्रमांक महिला अधिका-याच्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफिस (पीएसयू)चा आहे. यावरून वहानवटींना सात कॉल करण्यात आले. दरम्यान याची तक्रार देण्यास इतका उशीर का लावला, असा प्रश्न भाजपचे विचारला आहे.
नेते रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला.