आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attorney General Mukul Rohatgi To Review Lokpal Rules

लोकपाल नियुक्ती प्रक्रियेत बदलांसाठी समिती स्थापन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकपाल नियुक्ती नियमांत बदल करण्यासंबंधी पैलूंवर विचार करण्यासाठी केंद्र सरकारने समिती नेमली असून या समितीच्या अध्यक्षपदी महाधिवक्ता मुकुल रोहतगी हे असतील.

सूत्रांच्या माहितीनुसार, नियमांत बदल झाल्यानंतर सरकार लोकपालचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीबाबत पुढील पाऊल उचलेल. सर्च पॅनलतर्फे लोकपालचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली जाईल. मागील यूपीए सरकारमध्ये या निवडप्रक्रियेवरून भाजपने आक्षेप घेतला होता. त्यामुळेच लोकपालचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती होऊ शकली नव्हती. आठ सदस्यीय संशोधन समितीला लोकपाल अध्यक्ष आणि सदस्य पदासाठी व्यक्तींच्या नावाची एक यादी तयार करावी लागेल. त्यावर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समिती शिक्कामोर्तब करेल.

फेरविचार हवा : संशोधन करणार्‍या समितीला नावांची निवड कर्मचारी व प्रशिक्षण देणार्‍या विभागाकडून करावी लागणार आहे. त्यावर फेरविचार केला जाऊ शकतो. यातून संस्थात्मक दर्जा उंचावण्याचे काम केले जाऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.