आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळावर जाणारे होतील उद्ध्‍वस्‍त, सौदी धर्मगुरुचा फतवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतच्‍या मंगळ मोहिमेची तयारी अंतिम टप्‍प्‍यात आली असून मंगळवारी प्रक्षेपित होणा-या यानाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. मात्र, मंगळ मोहिमेविरुद्ध एका मुस्लिम गटाने फतवा काढला आहे. हा फतवा सौदी अरबच्‍या धर्मगुरुंच्‍या परिषदेचे सदस्‍य शेख अली अल हेमकी यांनी काढला आहे. त्‍यांनी मंगळावर कॉलनी वसविण्‍यास तीव्र विरोध केला आहे. जगातील मंगळ मोहिमा मुस्लिम परंपरेला धरुन नाहीत. मंगळावर जाणा-या प्रत्‍येकाचे आयुष्‍य हा प्रयोग उद्ध्‍वस्‍त करेल. असा प्रयोग जनावरांसोबत करावा, माणसांसोबत नव्‍हे, असे त्‍यांनी सांगितले.

'मार्स वन'प्रकल्‍पांतर्गत 2023पर्यंत मंगळावर नागरिकांना वसविण्‍याची तयारी करण्‍यात येत आहे. या प्रकल्‍पात जगभरातील 2 लाखांपेक्षा जास्‍त लोकांनी रुची दाखविली आहे.