आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंगफिशरच्या मालमत्तेचा लिलाव, चल मालमत्तेचा लिलाव सात सप्टेंबरला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तीन वर्षांपासून बंद असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सला कर्ज देणाऱ्या बँकांच्या वतीने कंपनीच्या चल मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील पहिला ऑनलाइन लिलाव सात सप्टेंबरला होणार आहे. यामध्ये एअरलाइन्सच्या कार आणि अवजड वस्तू ओढण्यासाठी वापरण्यात येणारे ट्रक यांच्यासह काही मालमत्तांची विक्री होणार आहे.
लिकर किंग नावाने प्रसिद्ध असलेल्या विजय माल्यांची किंगफिशर एअरलाइन्स ऑक्टोबर २०१२ पासून बंद आहे. जानेवारी २०१४ पर्यंत या कंपनीवर बँकांच ८००० कोटी रुपयांचे कर्ज होते. यावर बँकेला व्याज आणि हप्ता मिळत नसल्याचे बँकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
यातील सर्वात जास्त कर्ज हे भारतीय स्टेट बँकेचे आहे. याव्यतिरिक्त पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनायटेड बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक, कॉर्पोरेशन बँक, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, इंडियन ओव्हरसीज बँक, फेडरल बँक, पंजाब अँड सिंध बँक तसेच अॅक्सिस बँकेचादेखील पैसा कंपनीमध्ये अडकलेला आहे.

डिफॉल्टर घोषित
भारतीय स्टेट बँकेने किंगफिशर एअरलाइन्स, विजय माल्या आणि त्यांची कंपनी युनायटेड ब्रिव्हरिज होल्डिंग्जला "विलफुल डिफॉल्टर' घोषित केले होते. याआधी युनायटेड बँक ऑफ इंडियानेदेखील माल्या आणि त्यांच्या कंपनीला विलफुल डिफॉल्टर घोषित केले होते; मात्र कोलकाता उच्च न्यायालयाने याला रद्द केले होते. यामुळे या व्यक्तीला नंतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेणे अवघड असते.

ईडी करणार मनी लाँडरिंगची चौकशी
प्रवर्तन निदेशालयदेखील माल्या आणि किंगफिशरच्या विरोधात मनी लाँडरिंगची चौकशी सुरू करणार आहे. कंपनीने कर्जाच्या पैशातील मोठा भाग केमॅन आयलंड आणि मॉरिशससारख्या कमी कर असलेल्या देशांमध्ये पाठवला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा पैसा विमानभाडे नावाने पाठवण्यात आला होता. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.