आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Augusta Westland List In Blacklist, Defence Ministry Ask Advise To Law Department

अगस्ता-वेस्टलँडला ब्लॅकलिस्ट करणार,संरक्षण मंत्रालयाने विधी विभागाकडे मागितला सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अगस्ता-वेस्टलँड कंपनीसोबत 3 हजार 600 कोटी रुपयांचा हेलिकॉप्टर व्यवहार रद्द केल्यानंतर संरक्षण मंत्रालय आता या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्यांनी विधी मंत्रालय तसेच सीबीआयकडे सल्ला मागितला आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी सोमवारी सांगितले की, आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू असून विधी मंत्रालय आणि सीबीआयच्या सल्ल्यानंतरच यावर निर्णय घेतला जाईल. घाईगडबडीत एखादा निर्णय घेऊन नंतर कोणत्या अडचणी उद्भवू नये याची आम्ही काळजी घेतोय. याप्रकरणी सध्या या अँग्लो इटालियन कंपनीच्या बँक हमीबाबत तपासणी सुरू असून भारतीय बँकांमध्ये जमा रक्कम काढण्यात आली आहे. इटलीच्या बँक हमीबाबत सध्या चर्चा सुरू आहे. इटलीच्या न्यायालयाने या प्रकरणी स्थगितीचा आदेश दिला असून केंद्र सरकार त्याला आव्हान देणार आहे.
पाणबुडी प्रकरणाचा अहवाल मागितला
नौदलाची पाणबुडी ‘आयएनएस सिंधू’ मध्ये स्फोट झाल्याच्या सहा महिन्यांनंतर एका आणखी पाणबुडीची दुर्घटना झाली. ही दुर्घटना फार मोठी नसली तरी संरक्षणमंत्र्यांनी त्याला गांभीर्याने घेतले आहे. त्यांनी सांगितले की, याप्रकरणी संबंधितांनी प्राथमिक अहवाल पाठवला असून विस्तृत अहवाल लवकरच दिला जाणार आहे.