आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Augusta Westland Scam News In Marathi, Divya Marathi ,Money Laundering

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: व्यावसायिक गौतम खेतान यांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ३६०० कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील मनी लाँडरिंग चौकशी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी व्यावसायिक गौतम खेतान यांना अटक केली. खेतान हे या कंपनीच्या संचालक मंडळाचे माजी सदस्य आहेत.
लाच म्हणून ३६० कोटी रुपये दिल्याचा आरोप असून ही रक्कम कुठे गेली याची चौकशी ईडी करत आहे.
ईडीच्या अधिका-यां नी सोमवारी खेतान यांच्या दिल्लीतील दोन निवासस्थानांची झडती घेतली. झडतीत १ कोटी रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच काही ‘महत्त्वाची’ आर्थिक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर खेतान यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याखाली (पीएमएलए) अटक करण्यात आली. ईडीने या प्रकरणात गेल्या जुलैमध्ये खेतान, माजी वायुसेना प्रमुख एस. पी. त्यागी व इतर १९ जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीने केलेली ही पहिलीच कारवाई आहे. खेतान चंदिगडमधील एअरोमॅट्रिक्स कंपनीच्या संचालक मंडळात होते. कंपनीमार्फत हेलिकॉप्टर खरेदीत आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. या व्यवहारातील निधी एअरोमॅट्रिक्स आणि इतर काही कंपन्यांमार्फत वळवण्यात आली, असे चौकशीत आढळल्याचे सीबीआय आणि इतर तपास संस्थांचे म्हणणे आहे.