आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Airport News In Marathi, Divya Marathi, Union Aviation Ministry

औरंगाबादसह देशातील 93 विमानतळ तोट्यात, विमानतळावरून वाहतूक कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील 93 विमानतळ तोट्यात चालत आहेत. यातील 86 विमानतळ तर सलग तीन वर्षांपासून तोट्यात आहेत. यात दिल्लीतील सफदरजंगसह 13 राज्यांच्या राजधानीतील विमानतळ आहेत. औरंगाबादचा चिकलठाणा विमानतळ 20 कोटींनी तोट्यात आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानुसार या विमानतळांवरून वाहतूक कमी होणे हेच यामागील मोठे कारण आहे. हैदराबाद, भोपाळ, भुवनेश्वर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, श्रीनगर, जम्मू, सिमला, डेहराडून विमानतळ तीन वर्षांपासून तोट्यात आहेत.

विमानांची फारशी ये-जा या विमानतळांवर होत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. वाहतूक नसल्याने ते तोट्यात चालत आहेत.

कोठे किती तोटा
शहर2012-13
जयपूर 74
लखनऊ64
भोपाळ63
गुवाहाटी49
बंगळुरू45
सफदरजंग दिल्ली36
डेहराडून33
चंदिगड23.5
(रक्कम कोटींमध्ये)

तोट्यातून बाहेर काढण्यासाठी उपाय
० फ्लाइंग स्कूल उघडण्यासाठी परवानगी देऊन व्यवस्थापनात सुधारणा करणार.
० कार्गोच्या वाहतुकीत वाढ करणार. दरांमध्ये सुधारणा करणार.
० गैरवाहतूक महसूल वाढीसाठी कंत्राटे देणार.