आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Bajaj Factory Manufacture 200 Car Per Day

वाळूज बजाजमध्ये दिवसाला २०० कार, अपेक्षित किंमत सव्वा लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - औरंगाबादनजीकच्या वाळूज येथील बजाज ऑटोच्या प्रकल्पात दिवसाला २०० कार निर्मितीचा प्रकल्प सज्ज आहे. आता प्रतीक्षा आहे केवळ क्वाड्रिसायकल या श्रेणीला मान्यता मिळण्याची, अशी खंत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यक्त केली.सरकारकडून या नव्या श्रेणीला मान्यतेची बजाज ऑटोमध्ये सर्वजण चातकासारखी प्रतीक्षा करत आहेत. मान्यता मिळाल्यास बजाजची आरई ६० ही चारचाकी रस्त्यांवर धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. बजाज म्हणाले, तीन वर्षांपूर्वी कंपनीने ही चारचाकी विकसित केली त्यासाठी मोठी गुंतवणूक केली...मात्र अजूनही सुरक्षित व आरामदायी क्वाड्रिसायकलला सरकारकडून मान्यता मिळण्याची वाट पाहतो आहे.

दररोज २०० कार निर्मिती
वाळूज येथील प्रकल्पात २०० चारचाकी निर्मितीची तयारी पूर्ण झाली आहे. हे उत्पादन सुरू झाल्यास औरंगाबादच्या औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळेल. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन रोजगार निर्मिती होईल.
क्वाड्रिसायकल काय आहे : क्वाड्रिसायकल हा तीनचाकी व चारचाकी वाहनांचा सुवर्णमध्य साधणारा वाहनप्रकार आहे. तीनचाकीची सूत्रे वापरून सुरक्षित कार बनते. १८९० मध्ये हेन्री फोर्ड यांनी पहिली क्वाड्रिसायकल तयार केली. तिला सायकलची चार चाके व इथेनॉलवर चालणारे इंजिन होते.

बजाज ऑटो सज्ज
दोन वर्षांपूर्वीच ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीने आरई -६० ही चारचाकी सादर केली होती. आता या चारचाकीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी कंपनी सज्ज आहे. प्रतीक्षा आहे ती केवळ सरकारकडून मान्यता मिळण्याची.
आर.सी. माहेश्वरी, अध्यक्ष (व्यावसायिक वाहने), बजाज

औरंगाबादला मान
बजाज ऑटोच्या यशस्वी वाटचालीत वाळूज प्रकल्पाचे महत्त्वाचे स्थान आहे. अवघ्या देशाला मोहात पाडणाऱ्या व हमारा बजाज मनामनात रुजवणाऱ्या बजाज स्कूटरचे पहिले उत्पादन वाळूज येथेच झाले. तेथेच कंपनी पहिल्या चारचाकीची निर्मिती करील.