आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट होणार औरंगाबाद सिटी; 27 शहरांची तिसरी यादी घोषित, महाराष्ट्रातील सर्वाधिक 5 शहरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र सरकारने देशात १०० स्मार्ट सिटी विकसित करण्याच्या योजनेअंतर्गत मंगळवारी २७ शहरांची तिसरी यादी घोषित केली. यात सर्वाधिक ५ शहरे महाराष्ट्रातील आहेत. त्यात औरंगाबादही आहे.

या २७ शहरांंमध्ये ६६,८३३ कोटी रुपयांची गुंतवणूक लागेल.केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने स्मार्ट सिटी योजनेसाठी आजवर तीन टप्प्यांत २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ६० शहरे निवडली आहेत. उत्तराखंड, जम्मू-काश्मीरसह ९ राज्ये अाणि केंद्रशासित प्रदेशांतील शहरांची निवड होणे बाकी आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या २७ शहरांच्या यादीत सर्वाधिक ५ शहरे महाराष्ट्रातील, तामिळनाडू आणि कर्नाटकातील प्रत्येकी चार, उत्तर प्रदेशातील तीन व मध्य प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमधील प्रत्येकी दोन शहरांचा समावेश आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निवडलेल्या ६० शहरांमध्ये १.४४ लाख कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यातील २० शहरांत ८२ प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू झाली असून ११३ प्रकल्प लवकरच गतिमान होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

समस्या हाेणार बाद...
म्हणा, स्मार्ट अाैरंगाबाद...

स्मार्ट औरंगाबाद
चिकलठाणा, १६० एकर परिसरात
खर्च १३८५ कोटी रुपये

फायदा किती लोकांना?
किमान ४५,००० लोकांना थेट फायदा.
पुढे वाचा...

> ही कामे होतील
> स्मार्ट सिटी गाइड
> ही शहरेही होतील स्मार्ट
> पहिल्या वर्षी २०० कोटी
बातम्या आणखी आहेत...