आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'स्मार्ट सिटी\'तून औरंगाबाद बाद, पहिल्या टप्प्यात 13 राज्यांतील 20 शहरे होणार स्मार्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/औरंगाबाद- देशात शंभर स्मार्ट सिटी विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने गुरुवारी योजनेतील पहिल्या टप्प्यात समाविष्ट 20 शहरांची नावे जाहीर केली. यात महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर या शहरांचा समावेश आहे. दरम्यान, स्मार्ट सिटीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या औरंगाबाद, नाशिक या राज्यातील प्रमुख शहराची संधी मात्र या वेळी हुकली.

नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी पहिल्या टप्प्यातील २० शहरांची नावे जाहीर केली. यात मध्य प्रदेशातील सर्वाधिक म्हणजे ३ शहरांचा समावेश आहे. तर, उत्तर प्रदेश व बिहारमधील एकही शहर नाही. यानंतर दोन टप्प्यांत प्रत्येकी ४०-४० शहरांना स्मार्ट सिटी म्हणून विकसित केले जाणार आहे. या शहरांत अत्याधुनिक सुविधा दिल्या जातील, असे नायडू म्हणाले. या निवडीत केंद्राची थेट भूमिका नसल्याचे सांगून स्थानिक संस्था व लोकांकडून स्मार्ट सिटीबाबत मिळालेल्या सूचनांच्या आधारे स्पर्धात्मक पद्धतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

"स्मार्ट' लोकांना मिळाली भेट
केवळ शहरांची नावे केंद्राला पाठवली, दस्त तयार केले म्हणजे "स्मार्ट सिटी' मिळेल, असे अनेकांना वाटे. मात्र, प्रक्रिया तशी नव्हती. लोकांतून यासाठी सूचना मागवण्यात आल्या. ज्या शहरांतून प्रतिसाद मिळाला त्या शहरांची स्पर्धात्मक पद्धतीने निवड करण्यात आली. अर्थातच या शहरांतील लोक स्मार्ट ठरले. आपले गाव असे सहज "स्मार्ट सिटी' होऊ शकत नाही. त्यासाठी लाेकांच्या सहभागाचीच गरज असते, याचा प्रत्यय या माध्यमातून अाला.

गुंतवणूक प्राप्तीसाठी शहरांना करावे लागेल पतमानांकन :
स्मार्ट सिटीची निवड होण्यासाठी मुख्य आधार कोणता होता? आता काय प्रक्रिया असेल? अशा काही प्रश्नांची उत्तरे दैनिक भास्करचे प्रतिनिधी संतोष ठाकूर यांनी केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडून जाणून घेतली.

मध्यप्रदेशातील शहरांची निवड झाली. त्याचे निकष कोणते?
आम्हीजे निकष ठरवले होते त्यात सर्वात चांगले प्रदर्शन मध्य प्रदेशचे राहिले. यामुळेच त्यांची तीन शहरे या यादीत आहेत. जबलपूरच्या नावाने मलाही धक्का बसला. असो. अन्य शहरांतही अशी स्पर्धा व्हावी, असे आम्हाला वाटते.

मात्रटॉप-20 मध्ये भाजपशासित राज्य जास्त आहेत...
भाजप किंवा अन्य कोणत्या पक्षाच्या आधारावर याची निवड केलेली नाही. ओडिशातून भुवनेश्वर पहिल्या क्रमांकावर आहे. याच पद्धतीने केरळ, कर्नाटक, आसाम, तामिळनाडूतील शहरे पहिल्या वीसमध्ये आहेत. या शिवाय प्राधान्यक्रमात मंत्रालयाचा कोणताही हस्तक्षेप नव्हता. सर्व गुण स्वतंत्र संस्थांनी दिलेले आहेत. शहरांची नावे राज्य सरकारांनी पाठवली होती. त्यांच्यातील स्पर्धेच्या आधारावर निवड झाली आहे.
पुढील स्ल्इड्सवर जाणून घ्या, स्मार्टसिटी स्पर्धेतून औरंगाबाद का झाले आउट...
-ही 20 शहरे पहिल्या टप्प्यात होणार स्मार्ट
- का ठरले सोलापूर-पुणे स्मार्ट
-