आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Author Harun Khalid Comment On Intolerance At Pakistan

पाकमध्ये असहिष्णुता नित्याचीच : खालीद, तासीर यांच्या हत्येवर टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाकिस्तानी लेखक हरुण खालीद यांनी पाकिस्तानात असहिष्णुतेच्या घटना नेहमीच घडत असल्याचे म्हटले आहे. भारताचा सहिष्णू व शांत असल्याचा आव कधीच तुटणार नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली. पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे गव्हर्नर सलमान तासिर यांची हत्या असहिष्णुतेतूनच झाल्याचे खालीद म्हणाले. त्यांच्या कट्टरवादी सुरक्षा रक्षकानेच त्यांची हत्या घडवली.
सलमान तासीर यांनी असिया बीबी नामक ख्रिश्चन महिलेची मदत केली होती. या महिलेवर पवित्र भावनांविरुद्ध बोलल्याचा आरोप होता. असिया यांना देहांताची शिक्षा झाली. तिच्या बचावार्थ सलमान यांनी पुढाकार घेतला. त्यांचा सुरक्षा रक्षक मलिक मुमताज कादरी याला सलमान यांची हत्या केल्यामुळे इस्लामिक कट्टरवाद्यांनी गौरवले. तो इस्लामचा संरक्षक असल्याचे चित्र पाकमध्ये निर्माण झाले व तो हीरो बनला. सलमान तासीर यांना हत्येनंतरही इस्लामचे शत्रूच मानण्यात आले. लेखक हरुण खालीद यांनी या प्रसंगाचे वर्णन त्यांच्या
पुस्तकात केले आहे.
भारत सहिष्णूच
आपल्यातील बहुसंख्य सहिष्णू आहेत हा निव्वळ गैरसमज असून मूठभर असहिष्णू आपल्याला गप्प कसे करतील, असा प्रश्नही हरुण यांनी उपस्थित केला आहे.
भारतातील बहुसंख्य लोक मौन असल्याने सहिष्णुतेचा फुगा दिसत आहे. हादेखील फुटेल असे भाकीत त्यांनी वर्तवले. शीख, पारसी, हिंदू, ख्रिश्चन समुदायातील वास्तवही या पुस्तकातून दाखवण्याचा प्रयत्न हरुण यांनी केला आहे. पाकमधील अल्पसंख्याकांची आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थिती व वास्तव दर्शवण्यासाठी हे पुस्तक लिहिल्याचे हरुण यांनी सांगितले.
दारुण अवस्था
‘अ व्हाइट ट्रायल : अ जर्नी इनटू द हार्ट ऑफ पाकिस्तान्स रिलिजियस मायनॉरिटीज’ या हरुण यांनी लिहिलेल्या पुस्तकात पाकमधील अल्पसंख्याकांच्या दारुण अवस्थेचे वर्णन आले आहे. सलमान यांच्या मृत्यूनंतरही पाकमधील सहिष्णू म्हणवून घेणाऱ्यांच्या मौनावरही यात टीका केली आहे.