आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Author Of Fake Narendra Modi Video Apologises To Amitabh Bachchan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमिताभच्या आवाजात मोदींचा प्रचार, बिग बी भडकताच व्हिडिओ टाकणा-याचा माफीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना अमिताभ बच्च्न यांचा पाठिंबा असल्याच्या व्हिडिओ सध्या यू-ट्यूबवर पाहायला मिळतो. त्यावर बच्च्न यांनी संताप व्यक्त करून कारवाईचा इशारा देताच राजकोटच्या एका व्यक्तीने आपल्या कृत्याबद्दल त्यांची माफी मागितली. दरम्यान, हा व्हिडिओ बेकायदा असल्याचे मोदींनीही ट्विटरवरून जाहीर केले आहे.

बच्चन (70) यांनी 2007 मध्ये गुजरातचे अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी लीड इंडिया ही मोहीम राबवण्यात आली होती. त्या व्हिडिओमध्ये तांत्रिक करामती करून एक व्हिडिओ तयार करण्यात आला. त्यात अमिताभ यांनी मोदींना पाठिंबा दिल्याचे दाखवण्यात आले आहे. म्हणूनच हा व्हिडिओ खोट्या स्वरूपाचा आहे, असे अमिताभ यांनी ट्विट करून स्पष्ट केले. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून हा प्रकार बेकायदा असल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे माझे काही अल्बम प्रसिद्ध झाल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर विविध ग्रुप तयार झाले आहेत. त्यातूनच कोणीतरी हा व्हिडिओ आपल्याला पाठवला होता. 15 ऑगस्ट रोजी तो आपल्याला मिळाला होता. आपण केवळ तो अपलोड केला. व्हिडिओमध्ये अमिताभ दिसून आले. म्हणून सहजच तो यू -ट्यूबर अपलोड केला असे अपलोड करणा-या व्यक्तीचे म्हणणे आहे.

कोण आहेत महाशय ?
अमिताभ यांच्या व्हिडिओला अपलोड करणा-या व्यक्तीचे नाव उत्पल जिवराजानी असे आहे. उत्पल हे गुजरातमधील एक संगीतकार आहेत. त्यांचे ‘गुजराती शकीरा’, ‘गुजराती गंगनम ’ हे अल्बम लोकप्रिय झाले आहेत.

2007 चा व्हिडिओ
ज्या व्यक्तीने ही अशा प्रकारचा व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड केला आहे. त्याच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल. माझ्या सर्व चाहत्यांनो हा व्हिडिओ बनावट आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. माझ्या आवाजाचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे. 2007 मध्ये मी गुजरातसाठी एक मोहीम केली होती, असे अमिताभ यांनी आपल्या ट्विटमधून स्पष्ट केले.