आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • AAP Hit By Funding Controversy, BJP Claims \'Hawala At Midnight\'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार बोगस कंपन्यांकडून निधी; \'आप\'ला \'आवाम\'चा फास!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चार बोगस कंपन्यांकडून निधी घेतल्याच्या आरोपावरून आम आदमी पार्टी (आप) चांगलीच अडचणीत आली आहे. हा प्रकार उघडकीस आणणार्‍या "आप वॉलिंटियर्स अ‍ॅक्शन मंच'ने (आवाम) या कंपन्या काळा पैसा पांढरा करून चलनात आणण्याचे काम करत असल्याचे म्हटले आहे. संबंधित रक्कम घेऊन या कंपन्या तेवढ्या रकमांचे धनादेश देतात. नंतर तो पैसा सोपवताना या व्यवहाराच्या बदल्यात कमिशन घेतात, असा आरोप आवामने मंगळवारी केला. ५०-५० लाखांचे दोन धनादेशही आवामच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.

आवामचे गोपाल गोयल म्हणाले, "हा प्रकार उघड उघड मनी लाँड्रिंगचा आहे. या कंपनीच्या लोकांना अगोदर तेवढे पैसे दिले व नंतर त्यांच्याकडून त्या रकमेचा धनादेश घेतला.' या आरोपानंतर आपमध्ये प्रचंड खळबळ माजली. योगेंद्र यादव, आशुतोष, कुमार विश्वास, आशीष खेतान आणि मीरा सन्याल हे सहा नेते स्पष्टीकरण देण्यासाठी सरसावले. कोणत्याही प्रकारच्या चौकशीची आपची तयारी असल्याचे हे नेते दिवसभर सांगत होते. दरम्यान, आम आदमी पार्टीच्या (आप) नेत्यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले असून "आप'ला मिळालेल्या निधीसह भाजप व काँग्रेसला मिळालेल्या निवडणूक निधीची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची विनंती पत्रात करण्यात आली आहे. अशा चौकशीची तयारी दर्शवावी म्हणून अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही पत्र लिहिले आहे.

आवामने दिली ४८ तासांची मुदत : दोन कोटींचा निधी देणार्‍या कंपन्यांच्या नावांबाबत आपने ४८ तासांत खुलासा केला नाही तर ५ फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा आवामने दिला आहे. याची तक्रारी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हेविषयक शाखेकडे, कार्पोरेटविषयक कंपनी रजिस्ट्रार व अंमलबजावणी संचालनालयाकडे केली जाईल, असेही आवामने म्हटले आहे.

आवाम आहे काय?
आप व्हॉलिंटियर्स अ‍ॅक्शन मंचने (आवाम) अण्णा हजारे यांच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका निभावली होती. गोयल व आवामचे अन्य एक सदस्य करणसिंह एकेकाळी केजरीवाल यांचे विश्वासू होते. वाराणशीत करणसिंह केजरीवाल यांचे प्रचार यंत्रणेचे प्रभारी राहिले आहेत. दिल्लीत आपचे सरकार आल्यावर सिंह यांना लोकतक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

५०-५० लाख देणार्‍या ४ कंपन्या
सनव्हिजन एजन्सी, इन्फोलॉस साफ्टवेअर, गोल्डमाइन बिल्डकॉन आणि स्कायलँड मेटल या कंपन्यांकडून आपला ५ एप्रिल २०१४ रोजी २ कोटी रुपये मिळाले होते. पहिली कंपनी वगळता इतर तिन्ही कंपन्यांचे संचालक म्हणून हेमप्रकाश यांचेच नाव आहे. चारही कंपन्यांचे पत्ते झोपडपट्टीतील आहेत. मुळात या कंपन्याच तेथे नाहीत. दहा लाखांपेक्षा अधिक रकमेचा निधी चौकशी करूनच घेतला जातो, असा दावा आपने केला होता.

पुढे वाचा, "आप' रंगेहाथ सापडली : जेटली