आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑगस्ट, सप्टेंबरमध्येही सरासरीइतका पाऊस; मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- हवामान खात्याने मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज मंगळवारी वर्तवला. देशात अॉगस्ट-सप्टेंबरमध्ये सरासरीइतका पाऊस होईल, ऑगस्टमध्ये ९९% पर्जन्यमानाची शक्यता आहे. १ जून ते ७ ऑगस्ट या काळात देशभरातील पावसाच्या सरासरीत ३% तूट आहे. दक्षिण भारतात दुष्काळसदृश स्थिती आहे.   

सध्या अल निनो, इंडियन ओशन डायपोल हे घटक सर्वसाधारण स्थितीत आहेत. त्यामुळे यंदाच्या दुसऱ्या टप्प्यातही चांगले पर्जन्यमान अपेक्षित आहे. आतापर्यंत झालेल्या पर्जन्य वितरणावरून दक्षिण भारतात दुष्काळसदृश तर गुजरात, राजस्थान व ईशान्य भागात पूरसदृश स्थिती असल्याचे हवामान खात्याने या ताज्या अंदाजात म्हटले आहे.    

महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती
एक जून ते सात ऑगस्ट या काळात महाराष्ट्रातील चार हवामान विभागांपैकी तीन विभागांत पावसाने तूट नोंदवली आहे. मराठवाड्यात सर्वाधिक २८ टक्के, विदर्भ २७ टक्के, कोकण २ टक्के तूट आहे, तर मध्य महाराष्ट्रात ८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. खास पावसाच्या जुलैमध्ये मध्य महाराष्ट्र वगळता राज्यात इतरत्र पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...