नवी दिल्ली - नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू यांनी
आपण विमान प्रवासात आगपेटी घेऊन फिरतो, अशी कबुली दिली. नियमांनुसार, प्रवाशांना विमानात आगपेटी नेण्याची परवानगी नाही. एका कार्यक्रमात राजू म्हणाले, मी खूप धूम्रपान करतो. यामुळे माझ्यासोबत कायम माचिस असते. आधी विमानतळांवर ती काढून घेतली जायची. मात्र, आता मी मंत्री असल्यामुळे माझी विमानतळांवर तपासणी होत नाही. या माध्यमातून मी माझी आगपेटी लायटर जाऊ देत नाही.
मात्र, मला एक विचारावसे वाटते. आगपेटीची डबी सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक तरी कशी असू शकते? आगपेटीने विमानाचे अपहरण कसे केले जाऊ शकते? आगपेटीची डबी कुणासाठी धोकादायक ठरली आहे, अशी जगभरातील एकही घटना मी तरी ऐकलेली नाही. तथापि, उत्साहाच्या भरात आपण काय बोलून गेलो आहोत, हे राजू यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत स्वत:च्या बचावाचा प्रयत्न केला.