आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद केजरीवालांना पेस्ट्री खाताना पाहुन राष्ट्रपती म्हणाले, तुमचा खोकला बरा झालाय ना?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची विचारपुस करताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी)
नवी दिल्ली- हे छायाचित्र बुधवारी राष्ट्रपती भवनात आयोजित पद्म पुरस्कारांचे वितरण समारंभातील आहे. कार्यक्रमादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नाश्ता करत होते. केजरीवालांनी प्लेटमध्ये फक्त पेस्ट्री होती. केजरीवालांची रिकामी प्लेटपाहून स्वत: राष्ट्रपती प्रणव मुखर्जी त्यांच्याजवळ पोहोचले. केजरीवाल यांच्या खांद्यावर हात ठेवून तब्बेतीविषयी विचारपूस केली. राष्ट्रपती म्हणाले, 'तुमचा खोकला बरा झालाय ना?, समोसा, सॅंडविच, पकोडा, काला जामुन पण आहे. ते पण घ्या.
काही छायाचित्रे दिसायला सामान्यच असतात पर बरेच काही सांगणारी असतात. सगळ्यांचे लक्ष क्षणात वेधून घेतात. आता हेच पाहा, कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी दिलखुलास हसताना सगळ्यांनी पाहिले. दोघे दिग्गज का हसले माहीत नाही, पण त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. म्हणजे या दोघांचे असे हसणे सामान्य नाही, असे सर्वांनाच वाटले. अडवाणींना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 36 वर्षांत पहिल्यांदाच भाषण करू दिले नसल्याची बातमी आली. नंतर पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमातही त्यांना बोलावले नसल्याचीही बातमी आली. त्यामुळेच त्यांच्या अशा हसण्याने हे छायाचित्र खास ठरले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पद्म पुरस्कार वितरण समारंभाची फोटो...