आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘स्टार्टअप व स्टँडअप महाराष्ट्र’ला पुरस्कार; दिल्लीतील अांतरराष्ट्रीय व्यापार मेळावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या  ३७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात  महाराष्ट्राच्या ‘स्टार्टअप व स्टँडअप महाराष्ट्र’ या दालनास सर्वोत्कृष्ट सजावट व सादरीकरणाचा पुरस्कार मिळाला आहे. शनिवारी रात्री उशिरा या पुरस्काराची घोषणा झाली. केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सी.आर.चौधरी यांच्या हस्ते सोमवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


प्रगती मैदानावर हा मेळावा चालणार आहे. यात विविध राज्यांनी व्यापाराशी निगडीत अभिनव मेळावे, देखावे सादर केले आहेत. ‘स्टार्टअप व स्टँण्डअप इंडिया’ ही या मेळाव्याची मध्यवर्ती संकल्पना आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्यावतीने ‘स्टार्टअप व स्टँण्डअप महाराष्ट्र’ या संकेल्पनेवर आधारित राज्यात उद्योग क्षेत्राच्या प्रगतीचे दर्शन घडविणारे प्रदर्शन साकारण्यात आले आहे. ‘स्टार्टअप व स्टँडअप’योजनेच्या माध्यमातून राज्यात नव्याने उद्योग उभारणी करणाऱ्या राज्यातील प्रतिभावान तरुण उद्योजकांचे प्रकल्प यात दर्शविण्यात आले आहेत. स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी आणि लहान उद्योजकांना मिळालेली संधी, लघुउद्योगास चालना देणारे राज्याचे धोरण, विदेशी गुंतवणूक, पर्यटन आदी विषयांना स्पर्श करणारे आकर्षक महाराष्ट्र दालन यंदा महाराष्ट्राने उभारले आहे. मुंबई-अहमदाबाद ही देशातील पहिली बुलेट ट्रेन, मुंबई नागपूर समृद्धीमार्ग आणि त्याचे फायदे ही याठिकाणी दर्शविण्यात आले आहेत. याशिवाय राज्यातील लघु उद्योजकांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तू, महिला उद्योजिकांद्वारे निर्मित वस्तू,  पैठणीही याठिकाणी प्रदर्शन व विक्रीस ठेवली अाहे.

 

होतकरू अमोल यादवचे विमान आकर्षण

स्वबळावर आणि अनेक वर्षांच्या मेहनतीतून घरच्या छतावर विमान बनवणारा महाराष्ट्राचा अमोल यादव या मेळाव्यातही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याने बनवलेल्या विमानाची प्रतिकृती महाराष्ट्राच्या दालनाच्या मुख्यद्वाराचे खास आकर्षण आहे. अमोलला त्याच्या विमानाच्या उड्डाणाची चाचणी घेण्यासाठी नुकतीच विमान महासंचालनालयाकडून परवानगी मिळाली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...