आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षे लागोत की १५, अयोध्येचा वाद सोडवावाच लागेल : सुप्रीम काेर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाच वर्षे लागोत की १५ वर्षे, अयोध्येचा वाद सोडवावाच लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. दोन्ही पक्षांना यातून मार्ग काढण्यासाठी एकत्र यावे लागेल, यात कोणताही संशय असता कामा नये.

सर्वोच्च न्यायालयाने वरील टिप्पणी केल्यानंतर अयोध्येतील अस्थायी रामलला मंदिर परिसरातील ताडपत्री बदलण्याचे आदेश दिले. फाटलेल्या ताडपत्रीची माहिती आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. न्या. टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सरकार आणि दोन्ही पक्षांना म्हटले की, खटल्याची सुनावणी सुरू होण्यासाठी त्यांनी डिजिटल रेकॉर्ड प्राप्त करावे. हिंदू आणि मुस्लिम पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
निकालाचे डिजिटायझेशन
८००० पानांचे हे निकालपत्र असून शेकडो दस्तऐवज आहेत. ही संपूर्ण कागदपत्रे डिजिटाइज्ड केली जात आहेत. निकाल येऊन पाच वर्षे झाली तरी त्याची डिजिटल प्रत मिळाली नसल्याचे सुन्नी बोर्डाच्या वकिलाने सांगितले. असे असल्यास खटला कधी पूर्ण होऊ शकेल? न्यायालयाने रजिस्ट्री विभागाकडे इलेक्ट्रॉनिक प्रत प्राप्त संपर्क साधण्यास सांगितले. वेळेचे म्हणाल तर खटला पूर्ण होण्यास ५ वर्षे लागोत की १५, हे प्रकरण सोडवावेच लागेल.