आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायुर्वेदिक, युनानी डाॅक्टरांना अॅलाेपॅथी प्रॅक्टिसचीही मुभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयुर्वेदिक युनानी डाॅक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनची आव्हान याचिका फेटाळत सुप्रीम काेर्टाने या डाॅक्टरांना तशी मुभा दिली आहे. राज्यातील एक लाख डाॅक्टरांना हा दिलासा आहे.

आयुर्वेदिक, युनानी डाॅक्टरांना उपचारात अॅलोपॅथी औषधींचा वापर करण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यास विशेष अनुमती याचिकेद्वारे आयएमएने आव्हान दिले. न्यायमूर्ती नरिमन रोहिंग्टन सिकरी यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावताना अनेक वर्षांपासून संमिश्र चिकित्सा करणा-या डॉक्टरांचा हक्क अचानक कसा हिरावता येईल, असे म्हटले आहे.