आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Azad Says, They Will Go To The Court, Issue About DDCA

डीडीसीए प्रकरणी मोदी सरकारच्या विरोधात कोर्टात जाणार, कीर्ती आझाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचेनिलंबित खासदार कीर्ती आझाद यांनी मोदी सरकारविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) भ्रष्टाचारप्रकरणी त्यांनी दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली आणि सीबीआय विरुद्धही ते दाद मागणार आहेत. या प्रकरणी विशेष तपास पथक गठित करण्यात यावे, या मागणीसाठी कीर्ती न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. सीबीआय केवळ कठपुतळी असल्याची टीका त्यांनी केली.

त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली त्यांनी जेटलींना लिहिलेले पत्र या वेळी जारी केले. हे पत्र त्यांनी गेल्या सप्टेंबरात अरुण जेटलींना पाठवल्याचे सांगण्यात आले. डीडीसीए आणि हॉकी इंडियाला निष्प्रभ करण्यात भाजपच्या एका बड्या नेत्याचा हात असल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रात केला होता. ही दोन्ही व्यवस्थापने लवकरच दिवाळखोरीत निघतील. यासाठी सरकारला उत्तरे द्यावी लागतील, असेही या पत्रात म्हटले होते.