आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Azam Khan Again Stokes Controversy By Targeting Gandhi Family

इंदिरा, राजीव, संजय गांधींना अल्लाहनेच यमसदनी धाडले, बेताल आझम बरळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात सध्या वादग्रस्त व जातीयवादाला खतपाणी घालणारी वक्तव्ये विविध पक्षांच्या नेत्यांकडून सुरुच आहेत. दोन दिवसापूर्वी कारगिल युद्धाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता आझम खान यांनी पुन्हा एकदा तसेच वक्तव्य केले आहे. यावेळी आझम खान यांनी भाजप नव्हे तर काँग्रेसवर ते ही गांधी परिवारावरच हल्लाबोल केला आहे.

आझम खान यांनी म्हटले आहे की, इंदिरा गांधी, राजीव गांधी व संजय गांधी यांना अल्लाहने बरोबर शिक्षा दिली. त्यांच्या कामांमुळेच त्यांना मृत्यूने गाठले. इंदिरा गांधींनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात चालवलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार घडविले आणि नंतर त्यांची हत्या झाली. त्याआधी त्यांचा चिरंजीव संजय गांधी यांनी जबरदस्तीने नसबंदी कार्यक्रम चालविला आणि काही महिन्यानंतर विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. राजीव गांधी यांनी राम मंदिराचे बंद कुलूप उघडले व मंदिराचा शिलान्यास केला आणि पुढे कार सेवकांनी बाबरी मशिद पाडली. या सर्व घटना पाहता इंदिरा, राजीव व संजय यांना त्यांनी केलेल्या चुकांची शिक्षा अल्लाहने दिली आहे.
आझम खान यांनी शुक्रवारी एका प्रचारसभेत ही बेताल वक्तव्ये केली. संजय गांधी, राजीव गांधी यांनी मुस्लिमांच्या विरोधात निर्णय व भूमिका घेतल्याने अल्लाहने शिक्षा दिली आहे, असे खान यांनी म्हटले. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने वादग्रस्त व जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्याने आझम खान यांच्या प्रचार सभांवर बंदी घातली आहे. हा आदेश मिळण्याच्या तासभर आधी हे वादग्रस्त वक्तव्य खान यांनी केले आहे.